19.9 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeChiplunशासनाला गाळ काढण्यासाठी १ रुपया भिक द्या, चिपळूणवासियांचे भिक मागो आंदोलन

शासनाला गाळ काढण्यासाठी १ रुपया भिक द्या, चिपळूणवासियांचे भिक मागो आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात जुलै महिन्यात महापुराची भीषण परिस्थिती ओढावलेली. पण त्यानंतर जनता त्यातून बाहेर पडून सावरायला लागली. शासनाकडून अनेक प्रकारची तत्काळ मदत पुरविण्यात आली. आणि काही महिन्यानंतर मात्र सर्वच गोष्टी थांबल्या. शासनाची अनेक आश्वासने फक्त हवेवर विरून गेली. अनेकांचा सर्व संसार, कागदपत्र पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली.

पूरजन्य परिस्थिती का उद्भवली? आणि हि परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी नद्यांच्या गाळाचा उपसा होणे गरजेचे आहे. हि बाब शासन दरबारी सुद्धा अनेक लोकप्रतिनिधींच्या द्वारे मांडण्यात आली. परंतु, काहीच हालचाल दिसून न आल्याने, अखेर चिपळूण येथील नागरिकांनी सहा डिसेंबर पासून चिपळूणमधील पूरस्थिती बाबत साखळी उपोषण सुरू केले आहे.

त्या उपोषणकर्त्या नागरिकांना अनेक नेते, मंत्री, लोक प्रतिनिधींनी भेटी दिल्या, आश्वासने दिली तरीही परिस्थिती जैसे थे. गाळ काढा या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा शनिवारी तेरावा दिवस ठरला. रविवारी चिपळूणमध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला. त्याची रूपरेषा चिपळूण बाजारपेठेतील वाशिष्टी पुलापासून, बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत जाणार अशी होती.

चिपळूणच्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत. त्यामुळे भिक द्या भिक द्या, शासनाला गाळ काढण्यासाठी १ रुपया भिक द्या, असे भिक मागो आंदोलन चिपळूण बचाव समितीने शनिवारपासून सुरू केले आहे. हे भिक मागून मिळवलेले पैसे शासनाला देण्यात येणार असून गाळ काढण्यासाठी यातून नक्कीच अर्थसहाय्य होईल,  असे चिपळूण बचाव समितीचे शिरीष काटकर ,सतीश कदम, अरुण भोजने, राजेश वाजे यांनी स्पष्ट सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular