25.4 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeChiplunचिपळूणमध्ये हिंदी रहस्यमय चित्रपटाचे डीबीजे महाविद्यालयात चित्रिकरण सुरू

चिपळूणमध्ये हिंदी रहस्यमय चित्रपटाचे डीबीजे महाविद्यालयात चित्रिकरण सुरू

चिपळूणातील लोकेशन जगासमोर जावीत, अनेक दिग्दर्शक, निर्माते चिपळूणमध्ये येवून चित्रीकरण करावे.

कोकणच्या सौंदर्याला भुलून मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टी देखील आकर्षित होऊ लागली आहे. स्थानिकांना देखील होणाऱ्या चित्रिकरणामध्ये सहभाग घेता असल्याने त्यांना देखील आर्थिक हातभार लागायला मदत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये सध्या स्थानिक सुपुत्राचेच चित्रिकरण सुरु आहे.

चिपळूणचा सुपुत्र आफताब खान हा अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण करीत आहे. विशेष म्हणजे त्याचा पहिला चित्रपट चिपळूणमध्येच चित्रित होत असून हिंदीमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. एबी एलएलबी असे या रहस्यमय चित्रपटाचे नाव असून अनेक नामवंत कलाकारांसह स्थानिकांना घेवून येथील डीबीजे महाविद्यालयात चित्रिकरण सुरू आहे.

या चित्रपटाचे निर्माता आफताब खान व त्यांच्या टीमने सोमवारी शहरातील डीबीजे कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये पत्रकार परिषद घेवून या चित्रपटाविषयी माहिती दिली. या वेळी प्रसिद्ध अभिनेता संजय खापरे, समीर धर्माधिकारी, अभिनेत्री शुभांगी लाटकर, अभिनेत्री संध्या माने, अमित लेखवाणी, राहुल कुलकर्णी, अमित श्रीवास्तव, संजय गजरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आफताब खान म्हणाला, आपला हा पहिलाच चित्रपट चित्रित होत आहे. हिंदीमध्ये चित्रपट आणण्याचे कारण म्हणजे हा सिनेमा संपूर्ण जगात प्रदर्शित केला जाणार आहे. त्यातून चिपळूणातील लोकेशन जगासमोर जावीत, अनेक दिग्दर्शक, निर्माते चिपळूणमध्ये येवून चित्रीकरण करावे. येथील रूढी परंपरा निसर्ग जगासमोर जावा आणि आर्थिक वृद्धी व्हावी, या हेतूने या चित्रपटाचे चित्रिकरण चिपळूणमध्ये होत आहे. एबी एलएलबी हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular