चिपळूणसह कोकणची शान असलेले दुर्मिळ आणि पुरातन वस्तूंचे लोक्मान्य टीळक स्मारक ऐतिहासिक वस्तू संग्रहालय पुराच्या पाण्याने वेधले असून, अनेक दुर्मिळ वस्तूंचे नुकसान झाले आहे. दोन वर्षांपूर्वी लोकसहभागामधून पन्नास लाख रुपये खर्चून तर उभारण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या या पुरामुळे या वस्तू संग्रहालयामध्ये १० फुटापर्यंत पाणी चढल्याने संग्रहित करून ठेवलेल्या अनेक नाणी, सनद यांचे नुकसान झाले असून, पूर ओसरल्यावर शिल्लक राहिलेल्या चिखलामध्ये दुर्मिळ वस्तूंचा शोध घेऊन, त्या पुन्हा संग्रहित करण्यासाठी युद्धपातळी वर प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण कोकणामध्ये हे एकमेवच असे प्राचीन, ऐतिहासिक आणि पुरातन वस्तू असलेले हे संग्रहालय आहे. त्यामुळे,अनेक लोकांनी आपल्याकडील ऐतिहासिक वस्तू, जास्त करुन संग्रहित करण्यासाठी इथे दिल्या होत्या. परंतु, अनेक पुरातन वस्तू गुडघाभर पाण्यामध्ये नुकसानग्रस्त झाल्या आहेत. दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूमध्ये अष्मयुगीन अवजारे, हत्यारे, मुर्ती, जुनी नाणी, जुन्या काळातील वेगवेगळ्या धातूच्या तलवारी, विविध शस्त्रे, वेगवेगळ्या जुन्या पिढीची भांडी, दगडी दिवे अशा अनेक गोष्टी पुरामुळे खराब झाल्यात. त्याचप्रमाणे युद्धातील तोफा, प्राचीन काळात राजांच्या कारकिर्दीत वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अनेक वस्तू, शिलालेख, मान्यवर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संग्रहालयाची कागदपत्रे, सनदा यातील काही पाण्यात वाहून गेल्यात तर काही पाण्याखाली गेल्याने, खराब झाल्या आहेत.
त्यामुळे या संग्रहालयाची पुनर्निर्मिती करण्यासाठी येणारा साधारण खर्च २५ लाखापर्यंत येणार असून, कार्याध्यक्ष देशपांडे यानी अनेक दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयातील वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीसाठी ५० लाखांचा निधी दिला जाईल असे सांगितले होते, त्याप्रमाणे रत्नागिरी पालिकेकडे विकास कामांसाठी साडेचार कोटींचा निधी आला असून त्यातील चार कोटींच्या निधीची सध्या आवश्यकता असल्याने, उर्वरित पन्नास लाख रुपये वस्तुसंग्रहालयाच्या आणि वाचनालयाच्या उभारणीसाठी देत असल्याची घोषणा ना. सामंत यांनी केली.