26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeChiplunजमिनीच्या वादात चुलत भावाच्या पोटात चाकूने वार

जमिनीच्या वादात चुलत भावाच्या पोटात चाकूने वार

चिपळूण तालुक्यामध्ये भावकीमध्ये पालखीच्या वाटेवरून वाद विकोपाला गेला आणि बैठक सुरू असतानाच एकावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोकणामध्ये सध्या सर्वत्र शिमगोत्सवाचे वातावरण असताना चिपळूण तालुक्यामध्ये भावकीमध्ये पालखीच्या वाटेवरून वाद विकोपाला गेला आणि बैठक सुरू असतानाच एकावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावागावामध्ये असे जमीन जुमल्यावरून वाद निर्माण होणे हे पारंपार सुरूच असते. त्यामुळे सणासुदाला सर्व भावकी मिळून एकत्र गावात सण साजरा करतात.

परंतु, शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद चांगलाच पेटून उठला. या वादा विषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे असे समजते.

शिमगोत्सवानिमित्त पालखीची वाट मोकळी करावी अशी मागणी एका कुटुंबाने केली. या रागातून एकाने चक्क त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकू सारख्या धारदार हत्याराने वार केला. या प्रकारामुळे बैठकीला असलेले सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. तर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  हल्ला झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती मिळत आहे.

झालेल्या बैठकीमध्ये भोजने यांच्या दोन कुटुंबातील वहिवाटीचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. बैठकीत मात्र हा वाद चांगलाच उफाळून आला. त्यामुळे रागातून एकाने त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकूसारख्या धारदार हत्याराने वार केला आणि गंभीर जखमी केले. या अचानक घडलेल्या हल्ला प्रकरणामुळे बैठकीला उपस्थित ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES

Most Popular