24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunआपद्ग्रस्त भागातील दुकाने स्वच्छतेच्या कारणासाठी पूर्णवेळ उघडी

आपद्ग्रस्त भागातील दुकाने स्वच्छतेच्या कारणासाठी पूर्णवेळ उघडी

रत्नागिरी जिल्ह्या चौथ्या टप्प्यामध्ये अनलॉक झाला असला तरी, कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचा शिथिलीकरणामध्ये चौथ्या स्तराचे निर्बंध सुरु ठेवण्यात आले आहेत. परंतु, मुसळ्धार पावसाने आलेल्या पूरामुळे बाधित झालेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातील पूरबाधित गावांमधील दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चिपळूण आणि खेडमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर, मदतकार्यामध्ये कोणताही अडथळा किंवा समस्या निर्माण होऊ नये व शासकीय यंत्रणा कार्यरत राहावी, याचा विचार करून, शनिवार व रविवारी चिपळूण आणि खेडमधील सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसे प्रशासनाने आदेश काढले असून, कर्मचाऱ्यांना शनिवार रविवारची सुट्टी घेता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. दर शनिवार-रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असते ती रद्द करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागामध्ये सध्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. या अनुषंगाने नगरपालिका, पंचायत समिती, बांधकाम व अन्य शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. त्यामुळे

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरातील निर्बंध अजूनही लागू आहेत. या काळामध्ये अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, गेल्या २२ आणि २३ जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने चिपळूण आणि खेड तालुकयामध्ये महापूर आला होता. पूर ओसरल्यावर घरे आणि दुकानांमध्ये पुराच्या पाण्याने वाहून आलेला गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात साठला असल्याने त्यामुळे घरातील आणि दुकानांमधील सर्व वस्तू, भांडी, कपडे, अन्नधान्य इतर सर्व एकतर वाहून गेले आहे, नाहितर त्याचे नुक्सान झाले आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याचीही भिती निर्माण झाली आहे. खराब झालेल्या वस्तू आणि मालाची साफसफाई करणे आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे यासाठी दुकाने सायंकाळी चार वाजल्यानंतरही सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पूरबाधित दुकानदारांकडून करण्यात आली होती. ती लक्षात घेऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्त भागातील दुकाने स्वच्छतेच्या कारणासाठी विशेष बाब म्हणून दररोज पूर्णवेळ उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular