रत्नागिरी जिल्ह्यातील काही जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या अति पावसामुळे महापुराची परीस्थिती निर्माण झालेली. चिपळूण, खेड तालुक्यांची अवस्था एकदम भयावह झाली होती. एक मजली घरेच्या घरे, दुकाने पाण्याखाली गेली होतीत. दोन मजली घरांच्या तळमजला पूर्ण पाण्याखाली गेला असून, पहिल्या मजल्यावर पाणी यायला काहीशा पायऱ्याच शिल्लक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या आलेल्या पुरामध्ये अख्खी बाजारपेठ पाण्याखाली बुडाली होती. सर्व प्रकारची दुकाने पाण्याखाली असल्याने, अनेक व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरातील सर्वच वाहून गेले. पूर ओसरल्यावर सर्वत्र चिखल, माती, कचरा , घाण झाली होती. त्यामुळे चिपळूणकरांना सावरण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून मदत येत आहे.
पण सध्या चर्चा आहे ती, चिपळूण मध्ये दुसरा महापूर आल्याची. दुसरा महापूर हा नद्यांच्या पाण्याचा नसून तर माणसांचा आहे. सर्व व्यापाऱ्याचे साहित्य भिजल्याने, त्यांनी तो भिजलेला माल. साहित्य अगदी कमी किमतीमध्ये विकायला काढल्याने लोकांची स्वस्तात मिळणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. बाजारपेठेत लोकांचा आलेला महापूर पाहता, इतके दिवस शांत असलेला कोरोना पुन्हा वेगाने सक्रीय होण्याची लक्षणे दिसत आहेत.
बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने व्यापारी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्यामुळे आहे ते सामान असेल त्या परिस्थितीमध्ये विकून थोडफार का होईना पण काहीतरी त्या सामानाची किमत मिळेल या हेतूने सेल जाहीर केले आहेत. बाजारपेठेतील गर्दीमुळे पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नसल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. ग्रामीण भागामधून सुद्धा माणसांचे लोंढेच्या लोंढे कमी किमतीमध्ये वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत आल्याने, कोरोना निर्बंधांचा फज्जा उडाला आहे. तरीपण स्थानिक प्रशासन व्यापारी आणि ग्राहकांना वारंवार कोरोना निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना देत आहे.