24.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriरत्नागिरीत नागरिक त्रस्त सांडपाण्याची दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग

रत्नागिरीत नागरिक त्रस्त सांडपाण्याची दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग

शहरातील उघड्या गटारामुळे पाणी तुंबून राहिल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे.

स्वच्छ रत्नागिरी सुंदर रत्नागिरी, अशी मोहीम रत्नागिरी नगरपालिकेकडून राबवली जात आहे; मात्र ती कागदावरच आहे. शहरात फिरणाऱ्या कचरागाडीच्या लाऊडस्पीकरवरून फक्त घोषणाच दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी तुंबलेली गटारे, साचलेला कचरा अशी स्थिती आहे. शहरातून येणाऱ्या गटाराचे पाणी छोट्या वहाळांमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जटिल झाला आहे. शहरातील साळवीस्टॉप, कोकणनगर, चर्मालय चौक, उद्यमनगर, ओसवालनगर, चर्चरोड या ठिकाणी गटारात वहाळात दलदल, झाडे वाढलेली आहेत. वरचीआळी अठरा हाताच्या गणपती मंदिराकडे जाताना वाटेत कमालीची अस्वच्छता, घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.

शहरातील उघड्या गटारामुळे पाणी तुंबून राहिल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. परिसरातील नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील उघड्या गटारामध्ये मोठमोठी झाडे उगवली असून, यामध्ये उंदीर, घुशी व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले उघडे वहाळ, उघड्या गटाराच्या पाण्यात पक्षी, बाजूला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री, मोकाट जनावरे यांचा वावर असतो.  ओला पाला खाण्यासाठी ही मोकाट जनावरे अथवा भटकी कुत्री येत असतात. नर्मदा सिमेंट ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर चौकालगत उघडे गटार वहाळ आहे. या वहाळात नागरिक ओला व सुका कचरा टाकतात. रस्त्यालगत या कचऱ्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. वरचीआळी अठरा हाताच्या गणपती मंदिराकडे जाताना वाटेत कमालीची अस्वच्छता, घाण, दुर्गंधी पसरलेली आहे.

सेकंदभरही या ठिकाणी थांबता येत नाही, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. शहरातील जयस्तंभ ते खारेघाट रस्त्याने येणारे संपूर्ण सांडपाणी घुडेवठार येथील दत्तमंदिराजवळील मोकळ्या जागेत साचले असून, या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या डेंगीसह तापांच्या साथी दिवसेंदिवस वाढत आहेत. डासांच्या प्रतिबंधासाठी धूरफवारणी केली जाते; मात्र, तो तात्पुरता उपाय ठरत आहे. कचरा आणि उघड्या गटारामुळे शहरात ठिकठिकाणी दुर्गंधी पसरलेली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जटिल बनला आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular