25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeRajapurराजापुरात १५ दिवसांत वातावरणात बदल

राजापुरात १५ दिवसांत वातावरणात बदल

बंगालच्या उपसागरात तीव्र स्वरूपातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

फैजल चक्रीवादळाने वातावरणात बदल झाले आहेत. मागील आठवड्यात राजापुरात अधिक थंडी होती; मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी गायब झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला असे वातावरण असल्यामुळे त्याचा आंबा-काजू हंगामावर परिणाम होण्याची भीती तालुक्यातील बागायतदारांना सतावत आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम भागातील समुद्र किनारपट्टीवर फेंजल चक्रीवादळ धडकले आहे. चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात तीव्र स्वरूपातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे डिसेंबर थंडीचा महिना असूनही पावसाळी हवामान तयार झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तापमानात वाढ झाली. परिणामी, थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचा फारसा प्रत्यक्ष प्रभाव दिसलेला नव्हता. गतआठवड्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढले होते.

दोन दिवसांपूर्वी पहाटे तालुक्यातील काही भागांमध्ये हलकासा पाऊस पडला. त्यानंतर सलग तीन दिवस ढगाळ वातावरण होते. सकाळची थंडीही गायब झाली आहे. रात्री प्रचंड उष्मा जाणवत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचे वाढणारे प्रमाण आंबा-काजूला मोहोर येण्यासाठी अनुकूल ठरते. या महिन्यामध्ये मोहोर आल्यास चांगली आणि वेळेमध्ये फळधारणा होऊन बागायतदार अन् शेतकऱ्यांना चांगले उत्पादन अन् उत्पन्नही मिळते. मात्र, यावर्षी मोहोर येण्याच्या कालावधीमध्ये थंडी गायब झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आंबा-काजू हंगामावर होण्याची भीती बागायतदार, शेतकरी यांच्याकडून वर्तवली जात आहे. पुन्हा थंडी न पडल्यास यावर्षीचा आंबा आणि काजूचा हंगाम लांबणीवर पडून आर्थिक नुकसानीचा भुर्दंड सहन करावा लागण्याची चिंताही बागायतदारांना आतापासून सतावू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular