25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeMaharashtraतुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका, मुख्यमंत्र्यांची भावनिक साद

तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका, मुख्यमंत्र्यांची भावनिक साद

तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्या  वाढत चालल्या  आहेत. त्यातच एका शेतकऱ्याने विधानभवनासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने हि घटना हृदयाला स्पर्श झाल्याने त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक पत्रातून साद घातलीय. तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करु नका असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्याप्रमाणे  सरकार कायम बळीराजासोबत असल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी या पत्राच्या माध्यमातून दिली आहे.

महाराष्ट्र हा लढवय्यांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करता आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतू, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं,  तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत टोकाचे पाऊल उचलतात. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून दु:खी होऊन जातं. वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं….

काल एका शेतकऱ्याने विधानभवनाबाहेर थेट स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. दरम्यान यासंदर्भात शेतकऱ्यांनो तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे घातली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular