26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraमुख्यमंत्री शिंदे याना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सर्वत्र खळबळ

मुख्यमंत्री शिंदे याना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सर्वत्र खळबळ

रविवारी घडलेल्या घटनेने यंत्रणा सतर्क झाल्या असून खोटी माहिती पसरविणाऱ्या अविनाश वाघमारे याच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ता.०२ दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत वळवन येथे असलेल्या हॉटेल साई कृपा येथे अविनाश वाघमारे याने दारूच्या नशेत हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याचे बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याचे उद्देशाने आपल्या मोबाईल क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षास १०० नंबरवर कॉल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन चालू आहे ही खोटी माहिती पसरवली.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री शिंदे याना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली, यामुळे गुप्तचर यंत्रणाही अलर्ट झाल्या. शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पत्र आणि फोनवरही धमक्या मिळाल्या होत्या. रविवारी घडलेल्या घटनेने यंत्रणा सतर्क झाल्या असून खोटी माहिती पसरविणाऱ्या अविनाश वाघमारे याच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याची पोलीस नियंत्रण कक्षास खोटी माहिती देणाऱ्या एकावर लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अविनाश आप्पा वाघमारे वय-३६, रा. रमाबाई आंबेडकर नगर, साठे चाळ, घाटकोपर, मुंबई असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहराचे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वायदंडे यांनी फिर्याद दिली आहे.

एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याचे या वृत्तवाहिनेने म्हटले आहे. गेल्या महिन्यापूर्वी शिंदे यांना एकाने फोन करत धमकी दिली होती. त्या नंतर त्यांच्या कार्यालयात देखील एक धमकी वजा पत्र मिळाले होते. तसेच नक्षलवाद्यांनी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. रम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांची आणि मुख्यमंत्री निवास स्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular