24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraघटस्थापनेच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली

घटस्थापनेच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले कि, सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्या रोडावली असली तरी आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. शाळा आणि धार्मिक स्थळे कधी उघडणार ! यावर अनेक चर्चा, कारस्थाने , पक्षीय कुरघोड्या अनेक गोष्टी अनेक महिन्यांपासून घडतच होत्या. अखेर या दोन्ही बाबतीत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले कि, सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्या रोडावली असली तरी आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. भाविकांसाठी धार्मिक स्थळे खुली केली असली तरी त्याठिकाणी सुद्धा  आरोग्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. कोरोना निर्बंधामध्ये जे नमूद केलेले आहे ते,  चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर आणि  सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे. प्रत्येक धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीचा यामध्ये मोठ्या जबाबदारीचा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरी लाट अजून संपुष्टात आली नसून, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर, संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण प्रयोजन केले आहे. परंतु, बाधितांची कमी झालेली संख्या लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने अनेक बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे शासकीय नियम पाळूनच भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले राज्यात कोरोना संक्रमणाचा दर कमी झाला असून, धोका मात्र अद्याप पूर्ण टळलेला नाही. त्यामुळे टप्याटप्याने सर्व व्यवहार सुरु केले असले तरी सावधगिरी बाळगणे आवश्यकच असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular