23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriकोकण किनारपट्टीवर मत्स्य विद्यापीठ केव्हा?

कोकण किनारपट्टीवर मत्स्य विद्यापीठ केव्हा?

रत्नागिरीचे व नागपूरचे महाविद्यालय स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आली आहेत.

भारत जगात मत्स्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर तर कोळंबी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील एकूण मत्स्योत्पादनापैकी ७२ टक्के उत्पादन ७२० कि.मी. लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होते. त्यातील १२०० कोटीचे उत्पादन निर्यात होत असताना . देखील मत्स्यविज्ञान विद्यापीठ कोकण किनारपट्टीला नाही. कोकणात मत्स्य विद्यापीठ कधी होणार, असा सवाल कोकणविषयक प्रश्नांचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी दिली. अॅड. पाटणे यांनी म्हणाले, कोकणपासून दोन हजार कि. मी. अंतरावरील नागपूरच्या पशूविज्ञान विद्यापीठ केवळ विदर्भाला खुश करण्याकरिता राजकीय दबावामुळे तिकडे नेण्यात आले.

गोड्या पाण्यातील केवळ १.५७ लाख मेट्रिक टन मत्स्योत्पादनाकरिता नागपूर कॉलेज सुरू करणे हे एकवेळ समजण्यासारखे आहे; परंतु १९९८ ला पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरात अस्तित्वात आल्यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रे, पशुधन प्रशिक्षण व रत्नागिरीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या- पशुविज्ञान विद्यापिठाला जोडण्याचा उफराटा निर्णय झाला. महाराष्ट्रातून बरीच ओरड झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २००० ला सरकारने नोटिफिकेशन काढून मत्स्य विज्ञान महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापिठाला संलग्न ठेवण्याचा निर्णय घेतला.

रत्नागिरीचे व नागपूरचे महाविद्यालय स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आली आहेत. साधारणतः ७ ते ८ वर्षांपूर्वी नागपूरमधील पशू व मत्स्यविज्ञान विद्यापिठाकडे पुरेसा निधी व कर्मचारी नसल्याने महाराष्ट्र विधीमंडळात या प्रश्नावर चर्चा उपस्थित झाली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे डॉ. मुगणेकर समिती नेमण्यात आली व समिती निर्णय देईल त्या ठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले; परंतु त्या मुणगेकर समितीचा अहवाल धूळखात पडला आहे. जेव्हा निर्णय करावयाचा नसतो तेव्हा अशा समिती नेमल्या जातात, अशी खंत अॅड. पाट यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular