27.3 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...

गणेशोत्सवात ठेकेदारांना ‘निधी’चा प्रसाद…

सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्ग...

मुख्य संशयिताचे वडील ताब्यात, जयगड तिहेरी खून प्रकरण

जयगड येथील तिहेरी खूनप्रकरणी अटकेतील मुख्य संशयित...
HomeMaharashtraमुंबईत १ कोटी लोकांना मारण्याचा कट ? ३९ ह्युमन बॉम्ब!

मुंबईत १ कोटी लोकांना मारण्याचा कट ? ३९ ह्युमन बॉम्ब!

मुंबईत तब्बल १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसले,

गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आला असतानाच अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी मुंबई पोलीसांना एक धमकी आली आहे. मुंबईत तब्बल १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसले असून ते ३९ ह्युमन बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्सच्या माध्यमातून धमाका उडविणार असून सुमारे १ कोटी लोकांना मारण्याचा कट आखला असल्याची धमकी देणारा व्हॉटसअॅप मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या धमकीने मुंबई पोलीसांसह गृह विभागाची झोप उडाली आहे. दरम्यान सध्या देशात विरोधी पक्षनेते राहुल. गांधी यांनी केलेल्या ‘व्होटचोरी’च्या आरोपांनी खळबळ उडाली असतानाच त्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणीतरी जाणूनबुजून अशी पुडी सोडली असावी, अशी जनतेत चर्चा सुरू आहे. मुंबईतील गणेशोत्सव काळातच यावर्षी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे पोलीस दलावर मोठा ताण होता. याचा कोणताही परिणाम गणेशोत्सवावर होणार नाही, याची पोलीसांनी आणि संपूर्ण गणेशोत्सव अतिशय शांततेत पार पडला आहे. मात्र अचानक अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी आलेल्या धमकीने पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे.

व्हॉटस्अॅपवर मेसेज – मुंबई पोलीसांच्या अधिकृत व्हॉटस्अॅप नंबरवर एका अज्ञाताकडून हल्ल्याचा मेसेज पाठविण्यात आला आहे. या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मुंबईत ३४ गाड्यांम ध्ये ह्युमनं बॉम्ब लावण्यात आले आहेत. त्याशिवाय पाकिस्तानचे १४ खतरनाक दहशतवादी मुंबईत घुसले आहेत. हे ३४ ह्युमन बॉम्ब ४०० किलो आरडीएक्सच्या मदतीने धम ाका उडवणार आहेत.

१ कोटी लोकांना मारणार – या मेसेजमध्ये असेही म्हटले आहे की, मुंबईवर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही मोठा हल्ला केला जाणार आहे. तब्बल १ कोटी लोकांचा मृत्यू या हल्ल्यात होऊ शकतो. ४०० किलो आरडीएक्स त्यासाठी मुंबईत पोहोचले आहे. घुसलेले १४ दहशतवादी हा हल्ला यशस्वी करण्यासाठी तयार आहेत.

लष्कर-ए-जिहादी – या धमकीच्या मेसेजमध्ये लष्कर-ए-जिहादी या नावाच्या कॅथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख असून १ कोटी लोकांचा जीव घेण्याचा त्यांचा कट असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलीसांनी या धमकीनंतर अधिक सतर्कता बाळगली असून बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी कंबर कसली आहे. मुंबई पोलीसांचा सायबर सेल धमकी देणाऱ्यांच्या शोधांसाठी सक्रिय झाला आहे.

शोध सुरू – हा मेसेज मिळताच पोलीस मुख्यालय, अँन्टी टेरर स्कॉड, – सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आलीं आहे. वरळी पोलीस स्थानकात याबाबत अज्ञाताविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा मेसेज नेमका कोणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे. जोडीलाच मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तसेच बेस्ट बसस्थानक, एसटी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकांवर, मॉल्समध्ये विशेष पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

ड्रोनद्वारे नजर – १० हजार विशेष कॅमेरे आणि ड्रोनच्या साहाय्याने साऱ्या विसर्जन सोहळ्यावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांना विशेष सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनाही अलर्ट करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही अनोळखी किंवा अपरिचित वस्तूला हात लावू नये, अनोळखी व्यक्तीविषयी काही संशयास्पद आढळले तर पोलीसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

धमक्यांचा सिलसिला सुरूच – दरम्यान मुंबईत बॉम्बस्फोट किंवा घातपात घडविण्याची आलेली ही काही पहिली धमकी नव्हे. याआधीही अशा अनेक धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी वरळी येथील सीजनफोर या हॉटेलम ध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला होता. तर १४ ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये स्फोट होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. २६ जुलै रोजी छ. शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमक्यांची गांभीयनि। दखल घेण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये तपासाअंती कोणतीही संशयित वस्तू आढळली नव्हती. मात्र तरीही या धमकीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून सुरक्षाव्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular