27.6 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriमहाराष्ट्रातील कंत्राटी चालकांच्यावतीने राज ठाकरे यांच्याकडे "ही' मागणी

महाराष्ट्रातील कंत्राटी चालकांच्यावतीने राज ठाकरे यांच्याकडे “ही’ मागणी

राज्य सरकारने कोरोना काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी नर्स यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याची घोषणा केली आहे. मग शासन असा भेदभाव का करत आहे?

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आले असताना अनेक गोष्टींमध्ये त्यांनी विशेष लक्ष घातले आहे. एसटी संपकाळामध्ये जे पर्यायी चालक घेण्यात आलेले त्यांना भविष्यात कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.

शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संप केला. या काळात वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी रा. प. महामंडळाने बाह्यसंस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने महामंडळाच्या नियमानुसार कामगारांची नेमणूक केली. राज्य सरकारने कोरोना काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी नर्स यांना कायमस्वरूपी सामावून घेण्याची घोषणा केली आहे. मग शासन असा भेदभाव का करत आहे?  आमच्या समस्या कायमस्वरूपी सोडवून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमच्यावर आलेली उपासमारीची वेळ दूर करण्याचा प्रयत्न करावा, ही संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी चालकांच्यावतीने विनंती करण्यात आली आहे.

नेमणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील ८०० चालकांनी कमी पगार असूनही, इमानदारीने आपले कर्तव्य बजावले. बदली चालक नसताना, विनावाहक ८० ते ९० प्रवासी घेऊन जीवाची पर्वा न करता बसेस चालवल्या. एसटीला संपकाळात मदत करणारे कंत्राटी चालक एसटी महामंडळ कधीतरी आपल्याला सेवते घेईल, अशी आशा लावून बसला आहे.

एसटीच्या संपकाळात महाराष्ट्रातील ८०० चालकांनी महामंडळाने सांगितलेले कर्तव्य पार पाडले; मात्र संप मिटल्यावर, महामंडळाने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांना सहकार्य केले त्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली आहे. तरी महाराष्ट्रातील ८०० कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करणारे निवेदन विकास जाधव आणि विनायक भोसले यांनी राज ठाकरेंना दिले.

RELATED ARTICLES

Most Popular