कोरोनावर मात करण्यासाठी शासकीय नियमांबरोबर लसीकरण अनिवार्य आहे. मात्र शासनाकडुन लसीचे डोस मर्यादित येत आहेत. त्यामुळे नागरिकांना सहज लस उपलब्ध होत नाही. लसीकरणासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. तर काही ऑनलाईन नोंदणी काही मिनिटात फुल होत असल्याने इतरांना लस मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मागणी जास्त आणि डोस कमी असल्याने केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे जर स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन लस वितरण करण्यात आले तर संभाव्य गर्दीचा धोका उद्भवणार नाही.
जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या लसीकरणामध्ये ऑफलाईन लसीकरण प्रक्रियेत स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्यात यावे, असा ठराव आज पालिकेच्या सभेत करण्यात आला. त्यामुळे वॉर्डनिहाय स्थानिक नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ४५ वरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पालिकेतर्फे शहरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
केंद्राला मिळणाऱ्या एकुण लसीपैकी ५० टक्के ऑनलाईन तर ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करून दिली जात. आहे. शहरामध्ये तीन केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरामध्ये हा कार्यक्रम राबविले जात असताना स्थानिक नगरसेवकाचा विचार घेतला नाही. शहराच्या बाहेरील ग्रामस्थांची नोंदणी जास्त होत असल्याने अनेक वादविवाद निर्माण होत आहेत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये लसीकरणाचा हा विषय चर्चेत आला. तेव्हा ज्या ठिकाणी किंवा प्रभागात लसीकरण सुरू आहे, तेथील नगरसेवक आणि संबंधित सदस्यांना कळविणे आवश्यक आहे.