27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriरत्नागिरीतील अट्टल गुन्हेगाराचा कारागृहात अधिकाऱ्यावर हल्ला

रत्नागिरीतील अट्टल गुन्हेगाराचा कारागृहात अधिकाऱ्यावर हल्ला

पोलिस ठाण्यांमध्ये २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या व जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला करीत जखमी केले. साहिल अजमल कालसेकर (३५) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंग अधिकारी जगदिश ढुमणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, साहिल हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी सहाच्या सुमारास कारागृहातील मंडळ कार्यालयात अधिकारी साहिल याची गैरवर्तन न करण्याबाबत समजूत काढत होते. त्यावेळी साहिलने ‘मी तुमच्या नावाची चिड्डी लिहून आत्महत्या करेन, माझे डोक आपटून घेईन’ अशा धमकी देत टेबलवरील काठी उचलून ढुमणे यांना मारली. तसेच त्यांना मारहाण करीत दुखापत करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात साहिल विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल सराईत गुन्हेगार – सुत्रांच्या माहितीनुसार, साहिल विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, देवरुख, पोलादपूर, महाड पोलिस ठाण्यांमध्ये २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, चौरी, पोलिसांच्या अंगावर वाहने घालणे, स्वतःस दुखापत करून पोलिसांवर आरोप करणे, न्यायालयात कागदपत्रे फाडणे, पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे, असे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अमरावतीं मध्यवर्ती कारागृहातून जून २०२२ मध्ये इतर दोन कैद्यांसह साहिलने पळ काढला होता. त्याच्या वर्तवणूकीमुळे त्यास रत्नागिरी, नागपूर, अमरावती कारागृहांमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular