27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraनवाब मलिक यांची पुन्हा पत्रकार परिषद, क्रुझ ड्रग्ज प्रकरण नवीन अपडेट

नवाब मलिक यांची पुन्हा पत्रकार परिषद, क्रुझ ड्रग्ज प्रकरण नवीन अपडेट

क्रुझ ड्रग्ज प्रकरणामध्ये रोज नवीन काही न काही पुढे येत आहे. नवाब मलिक यांनी काल पुन्हा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंवर पुन्हा जुने नवे असे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं होतं की,  ७ तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांची ओशिवरा कब्रस्तान येथे भेट झाली होती. परंतु, त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही.

नवाब मलिक यांनी  म्हटलं होतं की, क्रूझ मध्ये जी केस बनवण्यात आली त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असं म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा मालक काशिफ खान आहे परंतु, त्याला आत्तापर्यंत अटक का झालेली नाही!! त्याने मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील ड्रग्ज पार्टीसाठी क्रुझवर येण्याकरिता खूप फोर्स केले होते.  त्याचप्रमाणे तो इतर सेलिब्रिटींच्या मुलांना देखील पार्टी मध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. त्याचा नक्की प्लान तरी काय होता, असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना अशा प्रकरणात अडकविणे? असं मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी सोशल मिडियावर ट्वीट करत समीर वानखेडेंना प्रश्न केला आहे कि, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे, त्यावर तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई-कोर्ट सर्व्हिसवरील काही स्क्रिनशॉट त्यांनी पुराव्यानिशी सादर करत सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. यावर समीर वानखेडे यांनी देखील योग्य ते प्रत्युत्तर दिले.

नवाब मलिक यांनी पुढे म्हटलं होतं की,   मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढा देत आहे. ड्रग्जच्या नावावर जे हजारो कोटी रुपयांची वसुली करतात आहेत आणि शिक्षा मात्र निरापधार भोगत आहेत. त्यांच्या विरोधात मी शेवटपर्यंत लढणार आहे. माझ्या जावयाने मला स्पष्ट सांगितले आहे कि, जर हे अशा प्रकारे चुकीच्या कारवाया करून गद्दारी करत असतील तर, तुमची हि लढाई शेवटपर्यंत सुरू ठेवा. त्यासाठी जरी मला २० वर्षे तुरुंगात राहावं लागलं तरी त्याला माझी काहीही हरकत नाही, परंतु, अशा गद्दार माणसांना मात्र सोडू नका.

RELATED ARTICLES

Most Popular