27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeInternationalदाभोळ बंदरात फास्टर बोटवर मत्स्य अधिकाऱ्यांची कारवाई

दाभोळ बंदरात फास्टर बोटवर मत्स्य अधिकाऱ्यांची कारवाई

मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी दिप्ती साळवी व सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांनी या अत्याधुनिक फास्टर बोटीवर धाडसी कारवाई केली आहे.

गेले काही दिवस आपली हद्द सोडुन परराज्यातील फास्टर बोटी येऊन मासेमारी करत असल्याच्या तक्रारी स्थानिक मत्स्य व्यवसायिकांककडून येऊ लागल्या होत्या. या सगळ्या तक्रारीची गंभीर दखल आता  मत्स्य विभागाकडून घेण्यात आली आहे. दापोली तालुक्यात दाभोळ बंदरासमोर १८-२० वाव परिसरात मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौका जॉन लोरन्स  IND-KA-01-MM-3328  नौकेला पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नौकवरील मासळीचा लिलाव करण्यात आला असून मिळालेली मासळीची रक्कम ३५ हजार ५५० रुपये शासनजमा करण्यात आली आहे.

वारंवार येणार्या तक्रारीमुळे, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी दिप्ती साळवी व सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांनी या अत्याधुनिक फास्टर बोटीवर धाडसी कारवाई केली आहे. परंतु, या फास्टर बोटी अधिकाऱ्यांसमोरच अन्य फास्टर बोटींनी घेराव घालून दहशतयुक्त भिती पसरवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्यावेळी जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही पोलिस संरक्षणही मत्स्यव्यवसाय पथकाला देण्यात आले नव्हते अशीही माहिती पुढे आली आहे.

मत्स्य विभागाचे पथक या परप्रांतीय बोटी असल्याची खबर मिळाल्याने दाभोळ बंदरापासून सरळ गेले पण परप्रांतीय नौका आहेत हे नेमके लक्षात येत नव्हते. याचवेळी दोन परप्रांतीय नौका फिशिंग करताना दिसल्या. त्यातल्या एका बोटीजवळ हे पथक गेले आणि त्यांना फक्त्त कागद चेक करायचे आहेत असे सांगितले. त्यामुळे त्यांनी मत्स्य विभागाची बोट त्यांच्या बोटीजवळ लावू दिली. मग मत्स्य विभागाच्या बोटीवरील  तांडेल आणि सुरक्षा रक्षक त्या परप्रांतीय फास्टर बोटीत गेले.

पण याचवेळी ती दुसरी नौका लांब जाऊन थांबली वायरलेसने त्या नौकेने बाजूच्या इतर नौकाना बोलावले व मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाच सहा बोटी जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. जोरात सायरन लावल्यावर त्या तिथेच थांबल्या. या कारवाईनंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या बोटीवरील तांडेल आणि सुरक्षा रक्षकाने बोट दाभोळ बंदरात आणली.

दाभोळ जेट्टीचे दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्याने, बोट गुहागर तालुक्यातील नवानगर जेट्टीला येथे आणून कारवाईचा पंचनामा करण्यात आला. ही कारवाई कामगिरी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी, दाभोळ  दीप्ती आस्वाद साळवी आणि सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांचा या पथकाने पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular