28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeMaharashtraदगडूशेठ हलवाई गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट

दगडूशेठ हलवाई गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट

कोरोनाच्या निर्बंधामुळे केवळ निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला.

सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणच्या गणपतीची एक वेगळीच ख्याती असते. अनेक भक्तगण आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवाकडे नवसरुपी मागण करतात. आणि इच्छा पूर्ण झाल्यावर नवस फेडायला देवाच्या दरबारी हजार होतात. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनाला पुण्यामध्ये येतात. या गणपतीला दरवर्षी लाखो-करोडो रुपयांचे दान भक्तांकडून करण्यात येते.

यावर्षी एका गणेशभक्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला १० किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.  या मुकुटांवर विविध प्रकारचे पाचू लावण्यात आले असून नक्षीकाम देखील एकदम रेखीव करण्यात आले आहे. आज गणपतीला हा मुकुट घालण्यात आला आहे. कोरोना काळामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आल्यामुळे, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात ठरविक लोकांच्या उपस्थितीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

कोरोनाच्या निर्बंधामुळे केवळ निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. कोरोना निर्बंधाचे शासनाने  आखून दिलेल्या नियमावली प्रमाणे कोणालाही उत्सवकाळात मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही आहे. मंदिर पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याने कार्यकर्त्याना देखील मंदिरात दर्शनासाठी जाता येणार  नसल्याचा मोठा निर्णय यंदाही ट्रस्टमार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि जनतेमध्ये नाराजी दिसून आली आहे. परंतु, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, ट्रस्टतर्फे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular