26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeLifestyleदैनंदिन जीवनात व्यायामाची गरज

दैनंदिन जीवनात व्यायामाची गरज

व्यायामाचे महत्व पौराणिक काळापासून जपले जात आहे. पूर्वी विविध प्रकारचे पण अत्याधुनिक अवजारांशिवायचे व्यायाम करण्यासाठी व्यायम शाळा स्थापन केल्या जात असत. निसर्गाच्या सानिध्यात, मोकळ्या आणि स्वच्छ हवेमध्ये व्यायाम करण्याने शरीराला त्याचे फायदे खूप जास्त प्रमाणात मिळतात.

व्यायाम करताना स्वत: स्वतासाठी नियम आखून घेऊन, त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे याची दक्षता आपणच घ्यावी. व्यायामामध्ये नियमितता असणे फार गरजेचे आहे. क्वचित प्रसंगी ठीक आहे. एखादा आजार झाला तर आपण लगेच डॉक्टरकडे धावतो, त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी. डॉक्टर उपाय म्हणून सुद्धा काही औषधे आणि नियमित व्यायाम करायला सांगतात. पण ते कधी आपल्या पचनी पडत नाही. मग नुसत्या औषधांचा शरीरावर मारा करून काय उपयोग?

सध्याच्या धावपळीच्या युगात, जेवण, खाणे, काम, व्यायाम यांचा ताळमेळ बसविणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. परंतु स्वतः:च्या निरोगी आयुष्यासाठी स्वतःच झटणे गरजेचे आहे. शरीरातील रक्त प्रवाह, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, इत्यादी मर्यादेमध्ये राहणे गरजेचे असते. त्यासाठी निदान दररोज चालण्याचा तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार कायमस्वरूपी शरीरात वास्तव्य करायला लागले आहेत. परंतु, याचा सिग्नल आपल्यालाच फार उशिरा कळल्याने उपाय सुद्धा त्यावर उशीरच केला जातो.

जसा व्यायाम निरोगी शरीरासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे, सकस आहार, मोकळी स्वच्छ हवा, शांत झोप आणि स्वतःसाठी निवांत असा वेळ जेंव्हा इतर कोणतेही डोकेदुखी ठरणारे अथवा मन विचलित करणारे विचार येणार नाहीत अशा सर्व गोष्टींची सुद्धा आवश्यकता आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये संतुलन राखण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular