24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriव्यापारी महासंघ आयोजित दसरा सोडतीचा पहिला बक्षीस वितरण सोहळा संपन्न

व्यापारी महासंघ आयोजित दसरा सोडतीचा पहिला बक्षीस वितरण सोहळा संपन्न

स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केल्यास ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

रत्नागिरी शहरामध्ये ऑनलाईन शॉपिंगच्या ऐवजी प्रत्यक्ष दुकानात येऊन ग्राहकांनी खरेदी करावी यासाठी व्यापारी वर्गांनी मिळून एक नवीन शक्कल लढवली आहे. एक आकर्षक बक्षीस वितरण योजना आयोजित केली आहे. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित भव्य बक्षीस योजनेतील दसरा सोडतीचा पहिला बक्षीस वितरण सोहळा मारुती मंदिर सर्कल येथे उत्साहात पार पडला.

या योजनेमध्ये सहभाग नोंदविलेल्या दुकानदारांकडून ग्राहकांना दसरा खरेदीवर कूपन देण्यात आली होती. यानुसार दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ज्येष्ठ व्यापारी प्रभाकरशेठ भिंगार्डे, माजी अध्यक्ष उदय पेठे,  ज्येष्ठ व्यापारी वीरकर यांच्या हस्ते पहिला लकी ड्रॉ काढण्यात आला होता. यानुसार प्रथम क्रमांकाचे बक्षीस दुचाकी गाडी विनायक सीताराम बंदरकर, माळ नाका, रत्नागिरी यांना प्राप्त झाले. तर श्रुतिका सीताराम कांबळे व सुकेशा राहुल नांदरे या दोन ग्राहकांना लकी ड्रॉ मध्ये ३२ इंच स्मार्ट एल.ई.डी टिव्ही मिळाले आहेत.

रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव, यांच्या हस्ते मारुती मंदिर सर्कल येथे आज या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्थानिक बाजारपेठेत येऊन खरेदीसाठी जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महसंघाच्या वतीने भव्य बक्षीस योजनेचे आयोजन केल आहे.

दसरा-दिवाळी-नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. परंतु, मागील कोरोनाची दीड ते दोन वर्ष व्यवसाय एकदम ठप्प झाला आणि त्यात ग्राहकांचा जास्त कल ऑनलाईन खरेदी वळल्याने हवी तेवढी बाजारपेठेमध्ये रेलचेल दिसून येत नाही.

त्यामुळे या योजनेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केल्यास ग्राहकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी प्राप्त होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी मारुती व्हॅगन आर तर दुसऱ्या क्रमांकासाठी होंडा ऍक्टिव्हा व इतर लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय प्रत्येक आठवड्यात ग्राहकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी जास्तीतजास्त ग्राहकांनी योजनेत सहभागी असणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करून बक्षिसे जिंकवित असे आवाहन रत्नागिरी व्यापारी महसंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular