सणासुदीला अनेक प्रकारचे गोड धोड पदार्थ, तळलेले पोळलेले पदार्थ खाणे जास्तच प्रमाणात घडते. पण अचानक असा मारा शरीरावर झाल्याने, कुठेतरी शरीराला सुद्धा हे स्वीकारणे कठीण बनत जाते. त्यामुळे गरज निर्माण होते ती बॉडी डिटॉक्स करण्याची. नेमकं काय असते बॉडी डिटॉक्स, जाणूया थोडक्यात.
चयापचय वाढवण्यासाठी वेळोवेळी शरीर डिटॉक्स करणे गरजेचे आहे. सणासुदीमध्ये तर ते अधिक महत्त्वाचे ठरते. कारण या दरम्यान एकाच वेळी खालल्या गेलेल्या तळलेल्या पदार्थांमुळे आपल्या शरीरात विषद्रव्ये तयार होतात. आणि याच विषारी घटकांमुळे शरीराला होणारा त्रास दूर करण्यासाठी शरीरातील विषारी घटकद्रव्य शरीरा बाहेर टाकणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेऊया अशी काही घरगुती पेये.
लिंबू-आलेचे पाचक – लिंबू आणि आले शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यासाठी एक ग्लास उकळत्या पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात एक इंच आल्याचा तुकडा किसून टाका. ते चांगले उकळले कि अर्धे गाळून त्याचे सेवन करा. तुम्ही ते सकाळी आणि रात्री जेवणानंतर पिऊ शकता.
हळदीचे दूध – सणासुदीच्या काळात शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हळदीचे दूध एक उत्तम पर्याय आहे. ते तयार करण्यासाठी, उकळत्या दुधामध्ये दालचिनीचा तुकडा, थोडी काळी मिरी, लवंग आणि वेलची आणि एक चमचा हळद घाला. ते ५ मिनिटे उकळवा. यानंतर त्यात मध घालून प्या. हे दूध रोज प्यायल्याने एक आश्चर्यजनक फायदा होतो.
ग्रीन टी – दुध मिश्रित चहाचे दिवसातून बऱ्याच वेळा सेवन करणे शरीराला घातक ठरू शकते. त्याऐवजी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिणे शरीरासाठी नक्कीच उत्तम ठरू शकते. ग्रीन टी मध्ये लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यास आणखी चांगले परिणाम मिळतील.
दालचिनी पेय – एका ग्लास पाण्यात एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर टाकून माध्यम आचेवर उकळा. त्यामध्ये अर्धा लिंबू आणि एक चमचा मध मिसळून ते गाळून चहा प्रमाणे, गरम सोसवे पर्यंत सेवन करा. हे पेय शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून तुमचे चयापचय सुधारण्या बरोबरच, शरीर डिटॉक्स करण्यास मदत करेल.