31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriरत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपदा जगाच्या नकाशावर आठ काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसंपदा जगाच्या नकाशावर आठ काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध

ब्लॅक मिल्डूज म्हणजे मुख्यतः जंगली अधिवासात येणारी निरुपद्रवी बुरशी.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या निरुपद्रवी काळ्या बुरशींवर (ब्लॅक मिल्यूज) राजापूरचे सुपुत्र डॉ. प्रतीक दिलीप नाटेकर यांनी संशोधन केले असून त्यातून, त्यांनी जागतिकस्तरीय आठ नवीन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोध लावला आहे. या संशोधनामुळे डॉ. प्रतीक नाटेकर यांनी ‘मायकोलॉजी ऑफ ब्लॅक मिल्डूज’ या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवले असून त्यांच्या या संशोधनामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसंपदा जगाच्या नकाशावर आली आहे. राजापूर शहरातील दिवटेवाडी येथील डॉ. नाटेकर यांनी ‘टॅक्सोनॉमिकल स्टडीज इन फॉलिकोलस ब्लॅक मिल्डू फंगी फ्रॉम रत्नागिरी अँड सिंधुदुर्ग डिस्ट्रक्टस’ या विषयावर पीएच.डी. करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळणाऱ्या निरुपद्रवी काळ्या बुरशींवर (ब्लॅक मिल्डूज) संशोधन केले. ब्लॅक मिल्डूज (काळी बुरशी) म्हणजे मुख्यतः जंगली अधिवासात येणारी निरुपद्रवी बुरशी.

साधारणपणे ज्या ठिकाणी हवेमध्ये जास्त प्रमात आर्द्रता असते त्या ठिकाणच्या वनस्पतींच्या पानावर, देठावर व खोडावर ठळकपणे काळे स्पॉट तयार करून फक्त जगण्यासाठी वनस्पतीमधील अन्न शोषून घेणारी बुरशी. आतापर्यंत कुठल्याच कृषी पिकावरती तिचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊन नुकसान झाल्याची नोंद नाही. (अपवाद फक्त सिट्रस मॅक्सिमा यावरती मेलिओला सिट्री-मॅक्सीमी हि प्रजाती थायलंड येथून नोंद केलेली आहे.) जागतिकस्तरीय अस्टेरिना डायसोझायली, अस्टेरिना मेलोटी, अस्टेरोस्टोमेला अस्टेरोस्टोमेला अस्टेरोस्टोमुला रायटी, सलासी, कॉक्सिनी, इरीणोप्सिस अनाकार्डी, मेलिओला हेटेरोफ़ाग्मी, मेलिओला राऊरीकोला या आठ नवीन काळ्या बुरशींच्या प्रजातींचा शोधदेखील लावला आहे. यासोबत या संशोधनामध्ये जिनस ‘मेलिओला’ प्रकारातील काळ्या बुरशीचा दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळल्या असून बुरशींचा समुद्रसपाटीपासून साधारणपणे १२५ मीटर ते ३७५ मीटर पर्यंत सर्वोत्तम अधिवास आदी विविध मुद्देही अधोरेखित झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular