28.1 C
Ratnagiri
Sunday, August 10, 2025

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांना सुविधा केंद्र – सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गणेशउत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी सुविधा केंद्र देण्यात...

सिंधुदुर्गात पुन्हा ‘लम्पी’चा प्रकोप…

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पशुपालकांचे कंबरडे मोडलेल्या 'लम्पी...

समुद्र शांत झाल्याने मच्छीमार आनंदात…

वातावरणाने साथ न दिल्यामुळे मासेमारी बंदी उठूनही...
HomeKokanदिवाळीनिमित्त मध्ये रेल्वेची विशेष घोषणा

दिवाळीनिमित्त मध्ये रेल्वेची विशेष घोषणा

मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं जाहीर केले आहे.

दिपावली चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिक अथवा पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं जाहीर केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत पर्यटनाचा बेत आखणाऱ्या पर्यटकांची संख्या यांचा विचार करता मध्य रेल्वेने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ट्रेन क्र. ०११८७/०११८८ लोकमान्य टिळक ट. ते मडगाव रेल्वे स्थानक ते लोकमान्य टिळक ट. विशेष (साप्ताहिक): गाडी क्र. ०११८७ लोकमान्य टिळक ते मडगाव रेल्वे स्थानक १६/१०/२०२२ ते १३/११/२०२२ या कालावधीमध्ये दर रविवारी लोकमान्य टिळक ट. येथून विशेष (साप्ताहिक) २२.१५ वाजता सुटेल आणि ही रेल्वे मडगाव जंक्शनला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी स्थानकावर थांबेल. ट्रेन क्र. ०११८५/ ०११८६ लोकमान्य टिळक ट. मंगळुरु रेल्वे स्थानक ते लोकमान्य टिळक ट. विशेष (साप्ताहिक): गाडी क्र.०११८५ लोकमान्य टिळक स्टेशन ते मंगळुरु रेल्वे स्थानक असेल ती २१/१०/२०२२ ते ११/११/२०२२ पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक ट. येथून २२.१५ वाजता विशेष (साप्ताहिक) सुटेल. ट्रेन मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

हि गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड येथे थांबेल. (एच), कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन. वरील गाड्यांच्या वेळा, तपशीलवार थांबे आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular