26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeMaharashtraपोलीस भर्तीचं स्वप्न आता अपुरेच, एसटीच्या पत्र्याचा धक्का लागून तरुणांचे हात कापले

पोलीस भर्तीचं स्वप्न आता अपुरेच, एसटीच्या पत्र्याचा धक्का लागून तरुणांचे हात कापले

बाजूने बस जात असताना या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून चक्क दोन तरुणांचे हात कापले गेले.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर-पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास काही तरुण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यावेळी याच मार्गावरुन मलकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून अधिक प्रमाणात बाहेर आला होता. बाजूने बस जात असताना या व्यायाम करणाऱ्या तरुणांना या पत्र्याचा धक्का लागून चक्क दोन तरुणांचे हात कापले गेले. इतकेच नव्हे तर एका क्षणात दोन्ही तरुणांचे हात तुटून पडल्याची गंभीर बाब समोर आली.

पोलीस भर्तीचं स्वप्न बाळगून सकाळी लवकर उठून त्यासाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. धावत्या एसटी बसच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले गेले असल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. या घटनेत दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी सुरुवातीला मलकापूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विकास गजानन पांडे व परमेश्वर पाटील अस या दोन्ही तरुणांच नाव असून त्यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे. दोघांच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी एसटी महामंडळाने उचलली आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे.

तप्त जमावाने मलकापूर बस आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयात हल्लाबोल केला. आगार व्यवस्थापक दराडे हे कार्यालयात असताना, या बसचा पत्रा तुटून बाहेर आलेला असूनही ती आगाराबाहेर कशी काढली, या तरुणाच्या झालेल्या कायमस्वरूपी नुकसानाचे काय? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular