25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraदहावी आणि बारावीच्या परीक्षांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट!

दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट!

मागील दोन वर्षापासून शाळा, कॉलेज पूर्णत: बंद ठेवण्यात आल्याने, शैक्षणिक प्रगतीवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष सर्व ऑफलाईन परीक्षा अधिक प्रमाणात रद्दच करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचे गुणांकन हे शालेय अंतर्गत मार्कांवरून देण्यात आले होते. यावेळेला मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु, राज्यात तुफान वेगाने फोफोवणारा कोरोना आता चिंता वाढवत आहे. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुद्धा सुरु झाले आहे. परंतु, यंदा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार कि नाही! याबद्दल शंका निर्माण होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी झालेला परीक्षांचा गोंधळ पाहता राज्य मंडळाला तयारी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून,  राज्य मंडळ अद्याप ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहे.

राज्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी पुढे सरसावले आहेत. मागील दोन वर्षापासून शाळा, कॉलेज पूर्णत: बंद ठेवण्यात आल्याने, शैक्षणिक प्रगतीवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने राज्यातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या केवळ दहावी आणि बारावीचेच वर्ग सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षा कशी होणार याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वच चिंतेत दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular