अल निनो’च्या प्रभावामुळे येत्या काळात तिव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील मान्सुन पर्यन्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभुमीवर भविष्यात तिव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात उन्हाळा अधीक तीव्र आणि संभाव्य पाणी टंचाईचे संकट ओढवणार असल्याने या नव्या संकटाचा सामना करण्यासाठी सतर्क राहण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. या एकुणच अंदाजानुसार चालु उन्हाळात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची संभावना आहे. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा हास लक्षात घेता अचानक पाणीसाठा खालावू शकतो.

या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाईची स्थिती सर्वसाधारण स्थिती पेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्त निर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये एप्रिल मे जून बरोबरच जुलै ते ऑगस्ट या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई निवारनार्थ विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या कृती आराखडयात पिण्याच्या पाण्याच्या तसेच पिण्या खेरीज इतर आवश्यक गरजांकरिता, जनावरांकरिता पाण्याची आवश्यता विचारात घ्यावी. धरणातील आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातून सिंचन व इतर नियोजीत आवर्तनांचे पुनर्विलोकन करून संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन करावे. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. जल जीवन मिशन अंतर्गत रेट्रोफिटींग अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना जुन पर्यंत पुर्ण होतील या करिता कार्यवाही करणेत यावी. पाण्याचे विविध स्तोत्र यांचा आढावा घेवून पर्यायी व्यवस्था निर्माण करणेत यावी. हातपंप, विंधन विहीरींची योग्यरित्या कार्यरत राहतील यासाठी दुरूस्ती हाती घेणेत यावी अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.