रत्नागिरी नगरपरिषदेकडून शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील जॅकवेल कोसळल्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल झाले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मात्र दुसऱ्या बाजूने प्रशासन आणि नगरपालिकेचे कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत. ठेकेदार आणि ६० ते ७० कर्मचारी, तांत्रिक कारागीर गेले १० दिवस युध्दपातळीवर कार्यरत आहेत. शनिवारी घेण्यात आलेली पंपीग ट्रायल यशस्वी झाली असून रविवारी टाकया “. भरल्यानंतर सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे अशी माहिती माजी पाणीसभापती निमेश नायर यांनी दिली.
शिळ धरणातील जॅकवेल कोसळल्यानंतर रत्नागिरी नगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याकरिता प्रयत्न सुरू झाले. शिळ धरणातून नविन जॅकवेलमध्ये पाणी आणणारी पाईपलाईन जोड़णे प्रचंड पाणी असल्याने अशक्य होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासित केले. त्यानंतर प्रशासनाने शिळ धरणातील पाणी नवीन जॅकवेलमध्ये आणण्याकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून २५ एचपीचे मोर्डा कंपनीचे ३ पंप मागविले. तर आणखी ३ पंप काही दिवसात लवकरच येणार असून या पंपाद्वारे तासाला १० लाख लिटर पाणी लिफ्ट होणार आहे.
सतत २२ तास पंपींग केल्याने शहराला आवश्यक १८ एम.सी. टी. थेट शिळ जॅकवेलमधून रत्नागिरी साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रात येणार आहे. नळपाणी योजनेच्या ठेकेदाराने या दरम्यान नव्या जॅकवेलमध्ये २ पंप बसवण्याचे काम केले आहे. युध्दपातळीवर सध्या ६० ते ७० कर्मचारी राबत असून त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर, पाणी विभागातील भोईटे, भिड्ये आदींचे सहकार्य मिळत आहे.
नागरिकांचा रोष संयमाने हाताळण्यास प्रशासनाला यश आले असून तीन आघाड्यांवर प्रशासनाने काम केले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ लक्ष घातल्यामुळे हे शक्य झाले आहे. दरम्यान शनिवारी रात्री पंपींगची ट्रायल घेण्यात आली. ही ट्रायल यशस्वी झाली असून रविवारी पाण्याच्या टाक्या भरण्यात येणार आहेत. त्यानंतर सोमवारी रत्नागिरीकरांना पाणी सोडण्यात येणार आहे. माजी पाणी सभापती निमेश नायर यांनी युध्दपातळीवर पुढाकार घे उघटनास्थळी जातिनिशी उपस्थित होते.