24.9 C
Ratnagiri
Saturday, October 25, 2025

कळंबस्ते येथे खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी…

चिपळूण तालुक्यातील रस्ते विकासासाठी आणलेला निधी पावसाच्या...

रत्नागिरीत शिवसेना युतीसाठी आग्रही; भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार

रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीच्या...

परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान…

यंदा दिवाळीचा उत्साह असतानाच, परतीच्या पावसाने सावंतवाडीसह...
HomeKhedडंपिंग ग्राऊंडचे होणार निसर्गोद्यान गुहागरमध्ये साकारला पहिला प्रकल्प

डंपिंग ग्राऊंडचे होणार निसर्गोद्यान गुहागरमध्ये साकारला पहिला प्रकल्प

गुहागर शहरातील गटार, नाले यांची तपासणी करण्यात आली होती.

कोकण पर्यावरणाच्यादृष्टीने अधिक सुरक्षित व सुजलाम सुफलाम करण्यासाठी केंद्र सरकार संलग्न असलेल्या एचएसबीसी बँक पुरस्कृत सीडीडी इंडिया बेंगलोर या एनजीओच्यावतीने गुहागर नगर पंचायत कार्यक्षेत्रातील डंपिंग ग्राऊंडमध्ये एफएसटीपी (फिकत स्लज ट्रिटमेंट प्लांट) मल गाळ प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प कोकणातील एकमेव प्रकल्प ठरला. असून गुहागरबरोबर आता म ालवण येथेही या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. सीडीडी इंडिया बैंगलोर या कंपनीच्यावतीने कोकणातील समुद्रकिनारी पर्यावरण संरक्षणाचे काम सुरु आहे. यातून त्या त्या ठिकाणी होणाऱ्या वातावरण बदलाचे निरीक्षण व परीक्षण या कंपनीच्यावतीने केले जात आहे. यासाठी एचएसबीसी बँकेतर्फे आर्थिक सहाय्य केले जात असून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. गेले काही महिने गुहागर शहरातील गटार, नाले यांची तपासणी करण्यात आली होती.

यामध्ये ई-कोलायचे प्रमाण दिसले होते. यामुळे समुद्र किनारपट्टी अधिक सुरक्षित करण्यासाठी व गुहागर नगर पंचायतीचा घनकचरा प्रकल्प जागा अधिक सुरक्षित असल्याने कोकणातील पहिला प्रकल्प गुहागर येथे उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, गुहागर नगर अभियंता विजय भूतल, स्वच्छता निरीक्षक प्रवीण जाधव, अभियंता आशिष खांबे यांना बेंगलोर येथे तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर गुहागर नगर पंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. एफएसटीपी प्रकल्प हा शौचालयाच्या मैलापासून खत निर्मितीबरोबर त्यामधून वेगळे करण्यात येणाऱ्या पाण्याचा वृक्ष संवर्धनासाठी वापर केला जात आहे.

याची क्षमता प्रती दिन ३ केएलडी असून गुहागर शहरातून संकलन होणाऱ्या शौचालयाच्या टाकीतील मैलाच्या प्रमाणानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी एन्व्हॉमेंट इंजिनिअरिंगवर आधारित सोलराईजचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून या एफएसटीपी प्रकल्पामधील आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मलावर जास्त. उष्णता देऊन त्या मलाची कुजण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. हनी वॅगनच्या सहाय्याने आणण्यात येणाऱ्या शौचालयाच्या मुलापासून सोनखत निर्मिती केली जाणार आहे. तसेच यामधील पाणी फिल्टर करून या पाण्याचा वापर झाडांसाठी केला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular