25.8 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeChiplunपीएम किसान योजनेसाठी ई केवायसी अपडेटमध्ये इंटरनेटचा खो...

पीएम किसान योजनेसाठी ई केवायसी अपडेटमध्ये इंटरनेटचा खो…

पीएम किसान योजनेचा चौदावा हफ्ता देण्यासाठी शासनाने संबंधित लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यात तालुक्यातील तीन हजार ७३२ पैकी एक हजार २०० हून अधिक लाभार्थ्याची ई केवायसी अपडेट झालेली नाही. त्यासाठी कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून गावोगावी भेटी देत लाभार्थी शेतकऱ्यांशी संपर्क साधून ई केवायसी अपडेट केली जात आहे. मात्र, अनेक गावांमध्ये मोबाईल रेंज, इंटरनेटचा असलेला अभाव आणि लाभार्थ्यांचे मुंबईला असलेले वास्तव्य आदींमुळे गावात जाऊनही मोबाईल ॲपच्या सहाय्याने ई केवायसी अपडेट करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ई केवायसी अपडेट नसलेल्या तालुक्यातील तीन हजार ७३२ लाभार्थ्यापैकी दोन हजार ४५३ लाभार्थ्याची ई केवायसी अपडेट झाल्याची तालुका कृषी अधिकारी अनिल गावीत यांनी माहिती दिली.  अद्यापही एक हजार २०० हून अधिक लोकांची अपडेट झालेली नसून, निर्धारित कालावधीमध्ये ती करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबविण्यात येत असून, त्यात शेतकऱ्यांना काही रक्कम वर्षाला दिली जाते. मात्र, काहींनी बोगस कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेतल्याची बाब मध्यंतरी पुढे आली होती. अशा प्रकारांना आळा बसावा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लोकांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाने अशा लाभाथ्यांना ई केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.कृषी विभागातर्फे गावोगावी भेटी देवून लाभार्थी शेतकऱ्यांशी संपर्क साधला असल्याचे तालुका कृषी अधिकारी श्री. गावित यांनी सांगितले. मात्र मोबाईल रेंज आणि इंटरनेटअभावी मोबाईल अॅपच्या सहाय्याने ई केवायसी अपडेट करण्यात अडथळे येत आहेत. काही लाभार्ती शेतकरी मुंबईला वास्तव्याला असल्याने त्यांच्याशी सुपर्क साधणे मुश्किल होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular