26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeMaharashtraनिवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला दिला केवळ १५ दिवसांचा कालावधी

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला दिला केवळ १५ दिवसांचा कालावधी

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला २३ ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू झालेल्या वादावर उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने चार आठवड्यांचा वेळ देण्यास नकार दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरेंना केवळ १५ दिवसांची मुदत दिली आहे.

शिवसेना नक्की कोणाची आणि त्याचे चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद उफाळून आला असून हा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. उद्धव ठाकरे गटाने या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला एवढा जास्त  वेळ द्यायला नकार दिला आहे. ठाकरे गटाला उत्तरासाठी केवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शिवसेनेला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह १९ ऑक्टोबर १९८९ रोजी मिळाले. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी निवडणूक आयोगाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांना पक्षाचे प्रमुख म्हणून कार्यकारणी समितीत निवडण्यात आले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला २३ ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे. त्या आधी राज्यातील सत्तासंघर्षावर २२ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर २३ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टापाठोपाठ निवडणूक आयोगातही उद्धव ठाकरे गटाचे टेन्शन वाढणार असल्याचं चित्र आहे.

शिंदे गटाने चिन्हासोबतच लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ शिवसेनेच्या राजकीय पक्ष रचनेतही आपलं प्राबल्य असल्याचा दावा केला आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहे. भाजपासोबत सरकार बनवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी मागणी केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular