33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriनेत्यांच्या दौऱ्यांतून निवडणुकीची तयारी, पावस गटामध्ये मोर्चेबांधणी

नेत्यांच्या दौऱ्यांतून निवडणुकीची तयारी, पावस गटामध्ये मोर्चेबांधणी

शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आपापल्या गावांमध्ये विकासकामे तातडीने करून घेण्यासाठी प्रयत्न करत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पावस परिसरामध्ये शिवसेना-भाजप व ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे संपर्क दौरे सुरू झाले आहेत. त्यामुळे कार्यकत्र्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरू झाली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत विनायक राऊत यांना भाजप, शिवसेनेची मते मिळाली होती; मात्र या वेळी शिवसेनेत फूट पडल्याने राऊत यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची मुदत संपूनही अद्याप निवडणुका जाहीर न झाल्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निरूत्साह जाणवत होता; परंतु २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका निश्चित असल्याने कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेते कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रमाच्यानिमित्ताने मतदार संघात फिरू लागले आहेत.

त्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मतदारांशी संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून दोनवेळा निवडून आले आहेत; परंतु या जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपला बरोबर न घेता आपल्या पक्षाचे अस्तित्व तयार करण्यासाठी या भागामध्ये दौरे करत आहेत. त्यामुळे युतीचा खासदार असूनही भाजप कार्यकर्त्यांना त्यांचा कोणताही फायदा झालेला नाही. त्यामुळे या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांना विकासकामांपासून वंचित राहावे लागले आहे. खासदारांबाबत भाजप कार्यकत्र्यांमध्ये नाराजी आहे. खासदार म्हणून या भागात कोणताही ठोस कार्यक्रम न केल्यामुळे विकासकामांच्या बाबतीमध्ये या जिल्हा परिषद गटांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यामुळे आमदार गट शिवसेनेमध्ये सक्रिय झाला आहे. आगामी निवडणूक ठाकरे गटाकडून लढवण्यासाठी विनायक राऊत जिल्हा परिषद गटांमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून फिरत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ठाकरे गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांचे या भागांमध्ये फारसे वर्चस्व नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदार संघांमध्ये विविध विकासकामांच्या माध्यमातून आघाडीवर आहेत. उदय सामंत यांनी प्रत्येक गावामध्ये निधी दिला आहे. विभागप्रमुख विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावांमध्ये रस्ता, पाणीयोजना, पाखाडी व अन्य विकासकामे प्रगतीपथावर आहेत. शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी आपापल्या गावांमध्ये विकासकामे तातडीने करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular