27.6 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeInternationalएलन मस्क यांच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भात केलेल्या ट्वीटने खळबळ

एलन मस्क यांच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भात केलेल्या ट्वीटने खळबळ

“माझा रहस्यमयरित्या मृत्यू झाला की, तुम्हाला हे जाणून आनंदच वाटेल”, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलेले आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय रोस्कोस्मोसचे प्रमुख रोगोजिन यांनी ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी निशाणा साधला होता आणि मस्क यांना युक्रेनला शस्त्रे पुरविण्याची धमकीदेखील दिली होती. रोगोजिन यांनी रशियन माध्यमांना सांगितले की, एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने इंटरनेट टर्मिनलला लष्करी हेलिकाॅप्टरद्वारे मारियुपोल शहरात नाजी आजोव बटालियन आणि युक्रनी मरीन फुटिरतावाद्यापर्यंत पोहोवचले. आमच्या माहितीनुसार स्टारलिंक उपकरणची डिलिव्हरी पेंटागनद्वारे करण्यात आली होती.

मायक्रोब्लाॅगिंग असलेले ट्विट खरेदी करणारे एलन मस्क यांनी आपल्या रहस्य मृत्यूसंदर्भात चर्चा केली आहे. आपल्या आश्चर्यकारक आणि वादग्रस्त ट्विटने नेहमीच चर्चेत राहणारे एलन मस्क यांनी पहिल्यांदाच आपल्या मृत्यूसंदर्भात भाष्य केलेले आहे. ते म्हणाले की, “माझा रहस्यमयरित्या मृत्यू झाला की, तुम्हाला हे जाणून आनंदच वाटेल”, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलेले आहे.

एलन मस्क यांच्या अशा बोलण्यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडलेले दिसत आहेत. मस्क यांना रशियन अधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी अशा आशयाचे ट्विट केलेले आहे. मस्क यांनी रशियन स्पेस एजन्सीचे संचालक दिमित्री ओलेगोविच रोगोजिन यांनी रशियाच्या माध्यमांसमोर केलेले विधान शेअर केलेले होते. रोगोजिन पुढे म्हणाले होते की,“एलन मस्क युक्रेनमध्ये फुटिरतावाद्यांना शस्त्र पुरवठा करत आहेत. तुम्ही किती मुर्ख असलात तरी चालेल, या प्रकरणात एलन मस्क यांना जबाबदार ठरविले जाणार”, असे भाष्य रोगोजिन यांनी माध्यमांना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular