27.4 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

गणेशमूर्ती निर्मितीच्या साहित्यांचे दर वधारले – २० ते २५ टक्के वाढ

आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन पुढील...

‘गोगटे’ बाहेरील रस्त्याची दुर्दशा – अभाविप आक्रमक

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या समोरील अरूअप्पा जोशी मार्गावरील...

उद्योजक, हॉटेल व्यावसायिकांना शॉक वाढीव वीजबिलांचा फटका

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने २५ जून २०२५...
HomeRatnagiriआईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले आईचे प्रेम

आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले आईचे प्रेम

या बछड्याला आता मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले आहे.

आई आणि बाळाचं नातं काही वेगळंच असतं.. आई आपल्या बाळांसाठी प्रसंगी स्वतः चा जीव धोक्यात घालण्यासही तयार असते. कितीही कष्ट पडले तरी बाळाला काहीही होऊ नये यासाठी आईचे प्रयत्न सुरू असतात. लांज्यातील पुनस येथे एका बिबट्याच्या बछड्याच्या बाबतीत असेच घडले आहे. पण आईच्या मायेला पारख्या झालेल्या या बछड्याचे वन विभागाच्या संवेदनशील कर्मचाऱ्यांनी हाल होऊ दिले नाहीत. या बछड्यांला आईचे प्रेम दिले. अगदी बाटलीने दूधही पाजले. अनेक प्रयत्न करूनही त्याची आई न सापडल्याने या बछड्याला आता मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवण्यात आले आहे. लांजातील पुनस येथील तिठ्याजवळ ८ मे रोजी बिबट्याचे एक पिल्लू सापडले. हे पिल्लू आपल्या आईपासून दुरावल्याचे लक्षात आले. मग त्या मायलेकराची भेट व्हावी म्हणून प्रयत्न सुरू करण्यात आले.

त्यासाठी हे पिल्लू ज्या ठिकाणी सापडले, त्याच जंगलमय परिसरात त्याला पुन्हा सोडण्यात आले. मात्र त्याची आई तिकडे फिरकली नाही. त्यानंतर साताऱ्याचे पशुवैद्यकीय वन्यजीव अधिकारी डॉ. निखिल बनगर यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी त्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली व त्याला पुन्हा एकदा जंगलातील त्याच ठिकाणी सोडण्यास सांगितले. त्या पिल्लावर कॅमेऱ्याची नजर होती. मध्यरात्री एक मादी बिबट बछड्याजवळ येऊन गेल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले, पण दुसऱ्या दिवशी बछडा तिथेच सापडला. त्याची आई येऊन त्याला घेऊन जाईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

शासकीय विश्रामगृहात झाली देखभाल – लांजा येथील शासकीय विश्राम गृहात ठेवून वनाधिकारी प्रकाश सुतार, वनरक्षक सारीक फकीर, श्रावणी पवार, नमिता कांबळे यांनी बछड्याची देखभाल केली. इतर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांना सहकार्य केले. बछडयाला बाटलीच्या मदतीने दूध पाजण्यात आले. दिवसातून चार वेळा त्याला दूध पाजले जात होते. कोल्हापूरहून खास खाद्याची पावडर मागवण्यात आली होती, ती त्याला भरवण्यात आली. बछड्याला कुठलाही संसर्ग होऊ नये म्हणूनही काळजी घेतली जात होती. रात्री त्याच्या झोपण्याची सोय एका टबमध्ये करण्यात आली होती. बिबट्याचे पिल्लू आणि त्याच्या आईची भेट व्हावी म्हणून आणखी एक प्रयत्न करण्यात आला. कोल्हापूर वनविभागाच्या थर्मल ड्रोनने पिल्लाच्या आईचा शोध घेतला गेला, पण त्यालाही यश आले नाही. अखेर त्या पिल्लाला शासकीय वाहनातून बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये पाठवण्यात आलेः आता तिथेच त्याचे पुढील संगोपन होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular