29.1 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeChiplunअखेर ४ वर्षांनी एन्रॉन पूल वाहतुकीस खुला...

अखेर ४ वर्षांनी एन्रॉन पूल वाहतुकीस खुला…

अवजड वाहतुकीसही पूल योग्य असल्याचा अहवाल नंतर वाहतूक सुरू केली.

२०२१ च्या महापुरात खचलेल्या गोवळकोट पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एनॉन पुलाचे दुरूस्तीचे काम अखेर मार्गी लागले आहे. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी मंगळवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आला आहे. तब्बल चार वर्षांनी या उक्ताड ते फरशीपर्यंतचा मार्ग सुरू झाल्याने स्थानिकांसह वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. महापुरात एनॉन पूल मध्यवर्ती भागात खचला होता. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत सार्वजानक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवासी वर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे औद्योगिक वसाहतीकडे येणाऱ्या-जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत होती. हा मार्ग बंद असल्याने वाहतूक गोवळकोट रोड ते पेठमापं पुलावरून वळविण्यात आली होती. मात्र अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी कायमवाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.

त्यामुळे या पुलाची तातडीने दुरूस्ती व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू झाले. स्थानिक आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर या पुलाच्या दुरूस्तीसाठी सुम ारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. या पुलाच्या कामासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरूवातीला दोन वेळा निविदा काढल्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी निविदा प्रक्रिया राबवत ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले. परंतु त्या कंपनीने उशिराने कामाला सुरूवात केली.

पावसाळ्यातील कालावधी सोडला, तर गेल्या दोन वर्षापासून या पुलाच्या खालच्या भागातील अंतर्गत दुरूस्ती सुरू होती. मात्र आता अंतिम टप्प्यात पुलाच्या नवीन पाईल्वर बीमो बांधकाम, तात्पुरत्या कालावधीसाठी बीमवर लोड हस्तांतरण, विद्यमान पाईल आणि कॅप्रा नाश, बीम दरम्यान स्लॅबो बांधकाम पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या पुलावर लोड टेस्टिंग करण्यात आली. अवजड वाहतुकीसही पूल योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular