निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार, छान आणि स्वस्थ झोप, आणि व्यायामाची आवश्यकता असते. परंतु सध्या आयुष्य एवढ व्यस्त होत चालले आहे कि, या व्यग्र दिनचर्येतून व्यायामासाठी ठराविक वेळ काढणे कठीण होत चालले आहे. प्रत्येकाला सकाळीच वेळ मिळतो असे नाही तर काही जणांना संध्याकाळची वेळ व्यायामासाठी योग्य वाटते.
असे वेगवेगळ्या वेळी करण्यात येणाऱ्या व्यायामामुळे नक्की शरीरावर काय परिणाम होतात. दिवसभरात नेमक्या कोणत्या वेळेमध्ये आणि किती वेळ व्यायाम करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. मागील तीन वर्षांपासून अनेक संशोधकांचे या प्रश्नावर संशोधन सुरु आहे. त्यानुसार काही तथ्ये समोर आली आहेत.
जि लॉक शरीराने स्थूल आहेत, अशा लोकांनी सकाळी व्यायाम करणे योग्य ठरत आहे. अशा लोकांमधील फॅट सकाळच्या व्यायामाने मोठ्या प्रमाणात बर्न झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अर्थातच स्थूलपणा कमी झाल्याचे लक्षात आले आहे. २०२० च्या संशोधनानुसार टाइप-२च्या मधुमेह ग्रस्त लोकांमध्ये दिवसभरातून तीनवेळा व्यायाम केल्याने ब्लड शुगरची पातळी कमी झाली. याच लोकांनी दुपारी तसेच सायंकाळी व्यायाम केल्याने ब्लड शुगरमध्ये आणखी जास्त घटलेली दिसली आहे.
शरीरातील पेशी दिवसा आणि रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतात. प्रत्येक प्रहरात शरीरातील मेटाबॉलिझम वेगवेगळे असते. जगभरात संशोधकांच्या अभ्यासामध्ये अलीकडेच व्यायामाच्या पैलूचाही अभ्यासाचाही समावेश करण्यात आला आहे, त्यानुसार, आपल्या शरीर रचनेनुसार दिवसा व्यायाम करणे नक्कीच फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे आपल्या शरीर प्रकृतीनुसार, दिवसातील ठराविक वेळ निश्चित करून व्यायामासाठी वेळ देणे अत्यावश्यक आहे.