29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeRatnagiriप्रवास तिकिटासंदर्भात प्रौढाची सुमारे ७७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

प्रवास तिकिटासंदर्भात प्रौढाची सुमारे ७७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक

पोलीस यंत्रणा तसेच बँक मधील कर्मचारी कायमच ऑनलाईन व्यवहारांबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन करत असतात

रत्नागिरीमध्ये ट्रॅव्हल्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत विमानातील सिट जवळ -जवळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रौढाची सुमारे ७७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन, अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार, अरविंद अस्थाना यांनी इज माय ट्रिप या ट्रॅव्हल्स कंपनीकडून त्यांचे व आईचे दिल्ली ते पटणा विमानाचे तिकिट बुक केले होते. परंतू या बुकिंगमध्ये त्यांची सीट आईजवळ नसल्याने त्यांनी गुगलवर सर्च करुन संबंधित इज माय ट्रिप ट्रॅव्हल्स कंपनीचा नंबर मिळवून त्यावर फोन करुन सीट जवळपास मिळण्याकरता सांगितले होते.

त्यानंतर लगेचच काही वेळामध्ये त्यांना फोन करुन अज्ञाताने तो इज माय ट्रिप  टॅ्रव्हल्स कंपनीतून बोलत असल्याचे खोटे सांगितले. तसेच सीट जवळपास मिळण्याकरता आपल्याला १० रुपयांचा एक्स्ट्रा चार्ज भरावा लागेल असे सांगून प्ले स्टोअरमधून एनी डेक्स हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे अरविंद अस्थाना यांनी अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड केल्यावर आलेल्या मेसेजवर त्यांनी क्लिक केले.

त्यानंतर अस्थाना यांनी बँक खात्यातून नेट बँकिंगचे १० रुपये भरल्यानंतर अज्ञाताशी फोनवर बोलत असतानाच त्यांच्या खात्यातून एकूण ७६ हजार ९५० रुपये ट्रान्सफर झाल्याचे त्यांना कळले. त्यावरून आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अरविंद अस्थाना यांनी बँकेशी रीतसर पत्रव्यवहार करुन सोमवारी रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस यंत्रणा तसेच बँक मधील कर्मचारी कायमच ऑनलाईन व्यवहारांबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन करत असतात. पण तरीही काही अशा घटना घडतातच.

RELATED ARTICLES

Most Popular