26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKokanसत्ताधारी आमदारांनी मिळून अर्धी ट्रेन तरी सोडायची !- नितेश राणे

सत्ताधारी आमदारांनी मिळून अर्धी ट्रेन तरी सोडायची !- नितेश राणे

गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये विशेष ट्रेन सोडण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणत मंगळवारी १८०० गणेशभक्तांना घेऊन मोदी एक्स्प्रेस  मुंबईहून कोकणसाठी मार्गस्थ झाली आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेली ही मोदी एक्सप्रेस आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी कोकण रेल्वे मार्गावर पुढील प्रवासासाठी निघाली आहे. रेल्वे सुरु झाल्यावर चाकरमान्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा एकच जल्लोष केला.

गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये विशेष ट्रेन सोडण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, कोकणात मी एकटाच भाजपचा आमदार आहे, असे असून देखील मी कोकणातील जनतेसाठी मोदी एक्स्प्रेस सोडू शकतो,  तर मग उर्वरित सर्व शिवसेनेचे आमदार असतानाही ते साधी अर्धी ट्रेन देखील सोडू शकत नाहीत, असा जोरदार टोला अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावला आहे.

मुंबईतील दादर टर्मिनसवरून सावंतवाडीपर्यंत जाणाऱ्या मोदी एक्स्प्रेसला गणेशोत्सवानिमित्त आज कोकणात जाण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मोदी एक्स्प्रेस मार्गस्थ होण्यापूर्वी नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी साधलेल्या संवादात शिवसेनेवर शाब्दिक टीकास्त्र डागले आहे. मागील दीड वर्षापासून उद्भवलेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे लोकांना कोकणात जाता आलेले नाही. मात्र ती उणीव आज भरून निघाली आहे. मी विरोधी पक्षात बसलेल्या भाजपचा कोकणातील फक्त एकमेव आमदार असून उर्वरित सर्व आमदार हे शिवसेनेचे आहेत. असे असतानाही मी एकट्याने जर एक ट्रेन सोडली, तर मग उर्वरित सर्व सत्ताधारी आमदारांनी मिळून अर्धी ट्रेन तरी सोडायची असा खोचक टोमणा मारला.

RELATED ARTICLES

Most Popular