30 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

‘या’ तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली

विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट...

जिल्ह्यात सरासरी ६४ टक्के मतदान, प्रक्रिया शांततापूर्ण

सकाळच्या सत्रापासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यानंतर...
HomeDapoliहर्णे बंदरातील मच्छीमारांची लगबग थांबली

हर्णे बंदरातील मच्छीमारांची लगबग थांबली

हर्णे बंदरात लहान मोठ्या साधारणपणे एक हजार नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत.

शासनाने १ जूनपासून मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांनी नौका आंजर्ले-अडखळ खाडीत आणून नौकांच्या शाकारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे बंदरात शुकशुकाट पसरला असून मच्छीमारांची लगबग आणि विक्रेत्यांची गडबड थांबली. केवळ जेटी नसल्याने हर्णै बंदरात मासेमारी करणाऱ्या बहुतांश नौकांना आंजर्ले, अडखळ खाडीत आसरा घ्यावा लागतो. आता बंदीचा कालावधी सुरू झाल्याने सुरक्षित जागा मिळेल तिथे मच्छीमार नौका शाकारून ठेवत आहेत. हर्णे बंदरात लहान मोठ्या साधारणपणे एक हजार नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै बंदर हे दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर असले तरी अजूनही हर्णे बंदरात मासेमारी नौका लावण्यासाठी जेटीची व्यवस्था नाही.

त्यामुळे बंदरातील नौकांना बंदरापासूनच दूर आंजर्ले, अडखळ खाडीसह दाभोळ बंदरात बोटी सुरक्षित लावण्यासाठी घेऊन जावे लागते. १ जून ते ३१ जुलै या दरम्यानच्या कालावधीत मासळीच्या प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या वीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मत्स्य खात्याने केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular