26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtra'प्लॅस्टिक बॉटल द्या आणि मोफत चहा वडापाव खा'

‘प्लॅस्टिक बॉटल द्या आणि मोफत चहा वडापाव खा’

या उपक्रमामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यास नक्कीच मदत होणार आहे.

राज्यात अनेक प्रकारच्या बंदी घालण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून आपला विभाग स्वच्छ आणि सुंदर राहील. त्यासाठी विविध आकर्षक उपाययोजना सुद्धा राबविल्या जातात. काही ठिकाणी तर त्या बाबतीत स्पर्धा घेऊन बक्षिसही दिले जाते. यापूर्वी आपण विविध सणांसाठीच्या स्पर्धा पहिल्या आहेत. जसे कि, दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळीत रांगोळी, कंदील बनविण्याची स्पर्धा, संक्रांतीला पतंग बनविण्याची स्पर्धा पण आज पाहणार आहोत एक अनोखी स्पर्धा आणि त्याचे सर्वाना प्रिय असलेले बक्षीस.

मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक कुठेही गेलात तरी वडापाव हा सर्वांचा कायमच फेवरेट राहिला आहे. पिपंरी- चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विभाग प्लास्टिकमुक्त होण्यासाठी “प्लॅस्टिक बॉटल द्या आणि मोफत चहा वडापाव खा’ या अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. उपक्रमात वडापाव विक्रेत्यांना सहभागी करून घेण्यासाठी महापालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देखील दिली आहे.

नागरिकांना महापालिकेच्या या उपक्रमातंर्गत काही ठराविक ठिकाणीच या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्याकडील प्लॅस्टिक बॉटल वडापाव विक्रेत्यांकडे जमा करायच्या आहेत. त्यानंतर ते वडापाव विक्रेते नागरिकांना मोफत वडापाव आणि चहा देणार आहेत. या उपक्रमामुळे प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यास नक्कीच मदत होणार आहे.

वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीनुसार जर प्लॅस्टिकच्या ५ बाटल्या दिल्या तर १ चहा आणि १० बाटल्या  दिल्यास तर १ वडापाव ग्राहकांना देण्यात येणार आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका उपक्रमात सहभागी वडापाव विक्रेत्यांना या मोफत वडापावची रक्कम पुरवणार आहे. वडापाव विक्रेत्यांच्या मदतीने महानगरपालिका प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करून बघणार आहे.

दरम्यान, महापालिकेने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देशातील सर्वच शहरांनी असे उपयोगी आणि समाजाचा विचार करणारे उपक्रम राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular