आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करणे आवश्यक आहे. पण कोणत्या वेळी कोणती गोष्ट खावी आणि खाऊ नये यासाठी सुद्धा काही निसर्गाचे नियम असतात. जसे कि फळे खाणे, आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे. शरीराच्या विकासासाठी फळे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. शरीराची गरज पूर्ण करणारे सर्व आवश्यक घटक फळांमध्ये आढळतात. एखादी व्यक्ती फक्त फलाहारावर अनेक दिवस जगू शकतो. पूर्वीच्या काळातही साधू संत फक्त फलाहार करून राहत होते.
परंतु, जरी फळे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असली तरी देखील फळे खाण्याची एक निश्चित वेळ असते. त्याबाबत उचित ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. काही लोक वेळ काळ न पाहता, सकाळ, संध्याकाळ, रात्र कधीही फळे खातात. पण आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे जर फळाचा पुरेपूर लाभ उपभोगायचा असेल तर सूर्यास्तानंतर कधीही फळांचे सेवन करू नये. चुकीच्या वेळी फलाहार केल्याने कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊया थोडक्यात.
आयुर्वेदानुसार, फळे खाण्याची उत्तम वेळ नाश्ता आणि दुपारचे जेवण या दरम्यानच मानली जाते. याशिवाय, तुम्ही ते सकाळपासून सूर्यास्तापूर्वी कधी पर्यंतही खाऊ शकता. दिवसा बरीच लोक अनेक कामांमध्ये सक्रिय असतात. अशा स्थितीमध्ये सेवन केलेल्या फळाचे सहज पचन होते आणि त्याचे पूर्ण फायदे मिळून पचनसंस्था मजबूत होते.
सूर्यास्तानंतर कोणतेही फळ खाल्ल्याने शरीराला फायदा होत नाही, तर ते नुकसान करते. याचे कारण असे आहे की सूर्यास्तानंतर, अन्नाच्या स्वरुपात अनेक बदल होतात. फळांसोबतही हे घडते आणि फळांमध्ये असलेले पोषक घटक नष्ट होऊ लागतात. यामुळे पचनसंस्थेत अडथळे येण्याची शक्यता असतेफळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे अन्न पचन होत नाही त्यापैकी बरेच अन्न पचनतंत्रामध्येच शिल्लक राहते. ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन पातळी वाढते. इन्सुलिन वाढण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका आहे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांचा धोका आहे.