22.2 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriगणपतीपुळे येथे एका पर्यटकाचा बुडून मृत्यू, ४ बचावले

गणपतीपुळे येथे एका पर्यटकाचा बुडून मृत्यू, ४ बचावले

विकेंड समुद्रकिनारी घालविण्यासाठी बाहेर गावाहून अनेक पर्यटक गणपतीपुळे येथे येतात. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आणि देवस्थाने सुद्धा २ वर्षानंतर सुरु झाल्याने लोक समुद्रकिनारी गर्दी करताना दिसत आहेत. अशेच गणपतीपुळे येथे रविवारी सायंकाळी लोटे खेड ५ पर्यटक येथून फिरायला आलेले. समुद्र स्थानाचा मोह न आवरल्याने आणि समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, या  पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.

१९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास हि घटना घडली असून, गणपतीपुळे येथील नेमलेल्या जीव रक्षकांनी चौघांना बुडवताना वाचवले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. वाचलेल्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नाकर कल्पनाथ सरोज असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

समुद्रस्नानाचा आस्वाद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्रात गेले असता रत्नाकर सरोज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात ओढले जाऊन बुडायला लागले. ही बाब त्यांच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली. गोलू समरजित सरोज , कपील रामशंकर वर्मा,  रोहीत संजीवन वर्मा,, मयूर सुधीर मिश्रा हे सगळे मूळ राहणार उत्‍तर प्रदेश, कामानिमित्त सध्या रा. लोटे खेड यांना बुडताना वाचवण्यात यश आले आहे. या लोकांची आरडाओरड ऐकून जीव रक्षक अक्षय माने,  अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर, ओंकार गवाणकर, आशिष माने  नी समुद्रात उड्या घेऊन पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतु रत्नाकर सरोज यांच्या नाका-तोंडात आधीच पाणी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला.

याबाबत माहिती मिळाल्यावर गणपतीपुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर मृत रत्नाकर सरोज यांचा मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. वारंवार प्रशासन, स्थानिक जनता अनोळख्या ठिकाणी समुद्रात न जाण्याचे सुचवत असून सुद्धा अशा प्रकारे करण्यात येणारे दुर्लक्ष जीवावर बेतते.

RELATED ARTICLES

Most Popular