23.6 C
Ratnagiri
Saturday, December 28, 2024

या अमित शहांचं करायचं काय… घोषणांनी सारी रत्नागिरी दणाणली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसह, शिवसेना उद्धव...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश

सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला...

सहलींच्या परवानगीत शाळांची दमछाक – शासकीय नियमावली

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे महिने शैक्षणिक सहली,...
HomeRatnagiriजिदालची वायूगळती, 'अगा जे घडलेचि नाही' की 'समजुतीचो घोटाळो'

जिदालची वायूगळती, ‘अगा जे घडलेचि नाही’ की ‘समजुतीचो घोटाळो’

जनतेत जी चर्चा सुरु आहे त्यामुळे २ शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीच्या वायूगळतीमुळे सुमारे १०० पेक्षाही अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ वायूबाधीत झाल्याची घटना सुमारे १५ दिवसांपूर्वी घडली आणि कोकणचे सारे औद्योगिक विश्व ढवळून निघाले. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी लगोलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन जिंदालला खडे बोल सुनावले… “जे घडले त्याची जबाबदारी जिंदाल कंपनीची आहे, त्यांच्या वायूगळतीचा सर्वांना त्रास झाला” अशा शब्दात त्यांनी कंपनीला झापले. त्यामुळे कंपनीवाल्यांची म्हणे अशी तंतरली की बोलता सोय नाही… पाठोपाठ त्यांनी तहसीलदारांना कंपनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला… तहसीलदारांनी हुकुमाची लगोलग अंमलबजावणी केली… तहसीलदारांनी स्वतः पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली व गुन्हा नोंद झाला… पोलिसांनीही तितक्याच तत्परतेने संबंधित पदावरील चौघांना अटक केली… एवढेच नव्हे तर मंत्रीमहोदयांनी शासनाच्या ७-८ ज्येष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमल्याचे जाहीर केले… हे सर्व फटाफट झाले… परंतु आता जयगड दशक्रोशीपासून ते रत्नागिरीपर्यंत जी चर्चा सुरु आहे ती पाहता ‘अगा जे घडलेचि नाही’ असे म्हणावे की ‘हा समजुतीचो घोटाळो’ असे म्हणावे अशी वस्तुस्थिती सामोरी आली आहे! जिंदाल कंपनीतून वायूगळती झाल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आल्यावर कंपनीची मंडळी गांगरुन गेली… काय बोलावे आणि काय करावे हेच त्यांना सुचेनासे झाले.

वस्तुस्थिती वेगळीच ! – जयगड विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेजमधील विद्यार्थी आणि काही स्टाफला या वायूगळतीचा त्रास झाला. गुरु. दि. १२ डिसें. २०२४ रोजी दु. २ ते ३ या दरम्यान ही घटना घडली. हे सर्व जिंदालच्या वायूगळतीमुळे घडले असा ठपका ठेवण्यात आला. परंतु आता वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या प्रमुख बाबी-

नेमके ‘आक्रीत’ कोय? – जिंदाल पोर्टमध्ये जहाजातून वायू उतरताना लिकेज झाल्याची ‘बोंब’ उठली आणि मग एकच ‘किच’ झाली. जिंदाल पोर्ट ते वायूचा त्रास झालेली माध्यमिक शाळा हे अंतर तब्बल २.३ कि. मी. (एरियल डिस्टन्स) आहे. या दरम्यान खुद्द जिंदाल पोर्टमधील सर्व स्टाफ, जिंदाल उर्जा प्रकल्पातील सर्व स्टाफ, जिंदाल कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्स, वाहनांसाठी ३ वाहनतळ, २-३ छोटे उद्योजकांचे वर्कशॉप व वाडीतील काही वस्ती आहे. परंतु तेथील एकाही व्यक्तीला वायूगळतीचा त्रास झाला नाही… थेट २.३ कि. मी. हवाई अंतरावरील. शाळेतील मुलांना व स्टाफपैकी दोघांना त्रास झाला. हा वायू क्षेपणास्त्राप्रमाणे हवेतून उड्डाण करुन थेट शाळेवर जाऊन आदळला का? अशी चर्चा आता जनतेत सर्वत्र सुरु झाली आहे. एकही जहाज आलेले नाही दि. १२ डिसें. रोजी दुपारी वायूचा त्रास झाला, जिंदाल पोर्टम धील बोटीतून एलपीजी गॅस उतरताना तो त्रास झाल्याची ‘बोंब’ उठली, परंतु त्या दिवशी कोणतेही जहाज जिंदा पोर्टमध्ये आलेले नाही किंवा वायू लोडींग वा अनलोडींगची कोणतीही कामे झालेली नाहीत. या बंदरात शेवटचे जहाज दि. १ डिसें. २०२४ रोजी येऊन गेले. त्यानंतर एलपीजी गॅसबाबत कोणतेही कार्य तेथे झालेले नाही… या. सर्व नोंदी कस्टमपासून एक्साईजपर्यंत ते बंदर खात्यापासून पोलिसांपर्यंत सर्व खात्यात मौजूद आहेत.

गॅस डिटेक्टर्स सज्ज – जर काही कारणाने वायू गळती झाली तर लगोलग ‘डिटेक्ट’ व्हावे यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार ‘एलपीजी फॅसिलिटी’ मध्ये तब्बल ३० गॅस डिटेक्टर्स सदैव सज्ज ठेवलेले असतात. जर पाव टक्का जरी गळती झाली तरी या डिटेक्टर्समध्ये सायरन वाजू लागतो. परंतु दि. १२ डिसें. रोजी एकाही गॅस डिटेक्टरमध्ये गॅस लिकेज रेकॉर्ड झालेला नाही वा क्षणभर देखील एकाही डिटेक्टरमधून सायरन वाजलेला नाही,

कुजलेल्या अंड्यासारखा वास – एलपीजी गॅस हा ‘नॉन व्हिजीबल’ म्हणजे डोळ्यांना दिसत नाही तसेच तो ‘ओडरलेस’ म्हणजे त्याला कोणताही वास नाही. म्हणून जर लिकेज झाले तर ते लगेच सम जावे यासाठी शासनाच्या नियमानुसार त्यामध्ये ‘इथील मर्ककॅपटन’ हा वास येणारा वायू मिसळला जातो. या वायूला ‘रॉटन एग्ज’ सारखा म्हणजे कुजलेल्या अंड्यासारखा वास येतो. असा कोणताही वास त्यावेळी झालेल्या कथित वायू गळतीचे वेळी कुणाला जाणवलेला नाही. याचाच अर्थ कंपनीतून वायू गळती झाली नसल्याचे स्पष्ट होते.

पार्किंगमध्ये रिकामे टँकर्स ! – जिंदालच्या पार्किंग झोनमध्ये रिकामे एलपीजी टँकर्स वा ट्रक्स पार्क केले जातात. ‘एलपीजी फॅसिलिटी’ मधून ‘लोड’ होऊन आलेले टँकर्स हे तेथे पार्क केले जात नाहीत तर ते त्वरित निर्धारीत स्थळी रवाना होतात. ही सारी वस्तुस्थिती पाहता पार्किंगम धल्या रिकाम्या टँकर्समधून वायु सुटल्याची शक्यता देखील उद्भवतच नाही अशी वस्तुस्थिती दशक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये खुलेआम चर्चिली जात आहे.

वारा विरुद्ध दिशेला ! – हवामान खात्याच्या ‘व्हेदर म ‘ ॉनिटरींग स्टेशन’मधील रेकॉर्ड पाहता दि. १२ डिसें. रोजी स. ९ ते दु. ३ या दरम्यान वाऱ्याची स्पीड सुमारे २.५ मीटर पर सेकंद इतकी होती व वारा २७० ते ३०० डिग्री या दिशेने वहात होता… म्हणजे उत्तरेच्या दिशेने वहात होता… याचाच. अर्थ त्यावेळी वारा शाळेच्या दिशेने नव्हे तर विरुद्ध दिशेने वहात होता. त्यामुळे वाऱ्याने जिंदाल जेटीवरील एलपीजी गॅस वाटेत अन्य एकाही व्यक्तीला त्रास न देता थेट विद्यामंदिरवर येऊन आदळला असे म्हणता येणार नसल्याचे देखील आता स्पष्ट झाले आहे.

ग्रामस्थांचा बिनतोड सवाल ! – जिंदाल जेटीवरुन हाताळणी करताना वायू गळती झाल्याची ‘बोंब’ उठली तेथपासून ते शाळेपर्यंतचे ‘हवाई अंतर’ २.३ कि. मी. आहे. रस्ता मार्गे हे अंतर ३ कि. मी. पेक्षाही अधिक आहे. या दरम्यान खुद्द कंपनीची गोडावून्स, वाहनतळ, जिंदालचा संपूर्ण उर्जा प्रकल्प, कर्मचाऱ्यांच्या स्टाफ क्वार्टर्स, काही उद्योजकांचे छोटे उद्योग, शेजारची वाडी हे सर्व असताना तेथील कुणालाही त्रास न देता हा वायू ‘गुपचूपपणे’ तेथून कसा काय निसटला आणि थेट शाळेवर जाऊन आदळला हे कसे काय? असा ‘बिनतोड’ सवाल आता साऱ्या दशक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये चर्चिला जात आहे.

मग वायू आला कुठून ? – शाळेतील काही विद्यार्थ्यांना व शाळेच्या स्टाफपैकी दोघांना या वायूचा त्रास झाला… मग हा वायू आला तरी कुठून? याचीही चर्चा आता साऱ्या परिसरातील जनतेत सुरु झाली आहे. शासकीय अधिकारी जसे विविध विषयात ‘पारंगत’ किंवा ‘विद्वान’ असतात तसे भले गावोगावचे ग्रामस्थ तज्ज्ञ नसतील परंतु त्यांना वास्तवाचे भान जबरदस्त असते…. अशिक्षीत खेडूताचा हवामानाचा व पावसाचा अंदाज अचूक ठरतो परंतु प्रचंड शिकलेल्या हवामान तज्ज्ञांचा अंदाज मात्र अनेकदा चुकतो!

२ शक्यतांची चर्चा ! – या साऱ्या परिसरातील जनतेत जी चर्चा सुरु आहे त्यामुळे २ शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यापैकी एक शक्यता अशी की, त्या शिक्षण संस्थेतील लॅबोटरीमध्ये काही केमिकल्स चुकीने मिसळली गेली असावीत आणि त्यातून निर्माण झालेला वायू शाळेच्या परिसरात पसरला असावा अशीही शक्यता जनतेत सुरु असलेल्या चर्चेत व्यक्त केली जात आहे. तसेच दुसरी शक्यता म्हणजे जिंदाल कंपनीवरचा राग काढण्यासाठी कुणीतरी एलपीजी गॅसचा सिलेंडर वाहनातून आणून शाळेजवळ त्यातील गॅस, मुक्त केला असावा… अर्थात हे सर्व जिंदाल कंपनीवर ‘बिल’ फाडायचे आणि त्यांना ‘कामास लावायचे’ अशा हेतूने करण्यात आले असावे असाही तर्क जनतेतील चर्चेत व्यक्त केला जात आहे.

कसून चौकशी आवश्यक – ते काही असले तरी त्या शाळेतील विद्यार्थ्यांना व स्टाफपैकी दोघांना वायूचा त्रास झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावी लागले ही वस्तुस्थिती होय ! नेमके काय घडले… कसे घडले… कुणाच्या चुकीमुळे घडले याचा कसून तपास झाला. पाहिजे… वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे जेणेकरुन पुन्हा अशी घटना घडू नये असे मत याबाबत बोलताना अनेक सूज्ञ नागरिकांनी सडेतोडपणे व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular