24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriआरोग्य भरती प्रक्रीयेमध्ये स्थानिक आणि कोरोना काळात काम केलेल्यांनाच प्राधान्य देण्याची मागणी

आरोग्य भरती प्रक्रीयेमध्ये स्थानिक आणि कोरोना काळात काम केलेल्यांनाच प्राधान्य देण्याची मागणी

जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना व कोरोना काळात काम केलेल्यांना यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

कोरोना काळामध्ये अनेक लोक बेरोजगार झालेत, तर काही वर्क फ्रॉम होम करत आहेत. अजूनही अनेक कंपन्यांची कामे हि वर्क फ्रॉम होमच सुरु आहेत. कोरोना काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मनुष्यबळ कमी पडत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट -क, गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात २०१९  ला काढण्यात आली.

खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र उमेदवारांनकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातुन लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले, मात्र काही कारणांनी ही संपुर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे कळवण्यात आले. मात्र त्यानंतर मोठा कालावधी गेला तरीही या आरोग्य विभागाच्या वतीने पुन्हा परीक्षा घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येते नाहीत.

बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्र शासनाचे वेळकाढू धोरण न अवलंबता तरुणांच्या करिअर बाबत शासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. तरी आम्ही भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ही परीक्षा तातडीने १५ दिवसात घेण्याची विनंती आपणास करीत आहोत. तसेच जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना व कोरोना काळात काम केलेल्यांना यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

रत्नागिरी मध्ये हे निवेदन रत्नागिरी उपजिल्हाधिकारी साठे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विक्रम जैन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मंदार लिंगायत, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, शहर चिटणीस निलेश आखाडे. आदी उपस्थिती होते. कोरोनाच्या भयंकर महामारीमध्ये जीवावर उदार होऊन काम करून जिल्ह्यातून कोरोना संक्रमण कमी करण्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे त्या कर्मचार्यांनाच भरती प्रक्रियेमध्ये प्रथम स्थान देण्यात यावे.

RELATED ARTICLES

Most Popular