27.3 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeMaharashtraग्लोबर टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा

ग्लोबर टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा

रणजितसिंह डिसले यांनी माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ७ जुलै २०२२ रोजी राजीनामा सादर केला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय ग्लोबर टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यांनी २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये शाळेमध्ये अनुपस्थिती दिसून आल्याने त्यांनी नेमके काय केले !, याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईलच तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हा परिषद सीईओंकडे गोपनीयरित्या सादर करण्यात आला आहे. परंतु, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे अगोदर आषाढी वारी आणि आता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने डीसले गुरुजींचा अहवाल सीईओनी अद्याप वाचलेला नाही आणि त्यामुळे कारवाई करण्यात आलेली नाही. पण रणजितसिंह डिसले यांनी कारवाई होण्याअगोदरच दि. ७ जुलै रोजी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते डायटमध्ये गेलेलेच नाहीत. त्यांनी हा संपूर्ण कालावधी ग्लोबल टिचर अ‍ॅवार्डची तयारी करण्यामध्येच घालवला, अशी त्यांच्या विरोधातील तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि मग त्यांच्या मागे चौकशीचे सत्र सुरु झाले.

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी रणजितसिंह डीसले यांची चौकशी करून अहवाल तसाच ठेवलेला. परंतु, विद्यमान शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी तो अहवाल पुन्हा उघडून त्याची स्वतंत्र चौकशी करून कारवाईची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. तत्पूर्वी, त्यांनी अमेरिकेत फेलोशिपला जाण्यासाठी रजा मागितली होती. पण, अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज तसाच प्रलंबित ठेवण्यात आला होता.

रणजितसिंह डिसले यांनी माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे ७ जुलै २०२२ रोजी राजीनामा सादर केला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी याला दुजोरा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular