29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraमहिला पोलिसांच्या ड्युटीत कपात, आता १२ तासांऐवजी ८ तासांची

महिला पोलिसांच्या ड्युटीत कपात, आता १२ तासांऐवजी ८ तासांची

पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या सर्वच महिलांना इतर कर्मचार्यांप्रमाणे बारा तासाची ड्युटी करावी लागते. महिला पोलिसांना कामा सोबतच कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते.

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पुरुषांबरोबर महिला कर्मचारी सुद्धा अधिकारी ते शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांची सुद्धा ड्युटी १२ तासांचीच असते. राज्य सरकारने महिला पोलिसांच्या ड्युटीबाबत मोठा निर्णय घेतला असून हि नक्कीच महिला कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे कि, महिला पोलिसांची ड्युटी आता १२ तासांवरून ८ तासांची करण्यात आली आहे.

कोणत्याही सण उत्सवामध्ये सर्व पोलिसांना बारा- बारा तास ड्युटी करावी लागते. त्यामुळे ड्युटीमधील तासांमध्ये कपात करण्याचा विचार सुरू होता, असं संजय पांडे यांनी सांगितलं. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना काम आणि घरगुती कामाची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांच्या कामाच्या तासामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या सर्वच महिलांना इतर कर्मचार्यांप्रमाणे बारा तासाची ड्युटी करावी लागते. महिला पोलिसांना कामा सोबतच कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासापेक्षा जास्त वेळ ड्युटीवरच कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारी आणि कर्तव्यावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला पोलिसांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय उत्तम निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंब आणि नोकरीमध्ये उत्तम ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार’, असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular