25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeMaharashtraभावनिक होऊन निर्णय न घेता, जबाबदारीने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पाहिजे –...

भावनिक होऊन निर्णय न घेता, जबाबदारीने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पाहिजे – अजित पवार

पाच टक्के आरक्षण देताना एखादा न शिकलेला उमेदवार असेल तर बाकीचे स्पर्धा परिक्षा देणारे काय करणार!

राज्यात सर्वत्रच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला असून, मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नागपुरात अजित पवार यांनी भाष्य केले आहे. वेगेवेगळ्या प्रकारचे मान्यता असलेले खेळ राज्यात, देशात खेळतात. आणि ते खेळ खेळून राष्ट्रीय पातळीवर जेव्हा खेळाडू नाव लौकिक मिळवतात तेव्हा त्याना नोकरीमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना आरक्षण देतो. पण, दहीहंडी या खेळाचा काय रेकॉर्ड ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपरात स्पर्धा परीक्षेसाठी आरक्षण असल्याने अनेक मुले तयारी करत आहेत, याचाही विचार मुख्यमंत्री यांनी कोणतीही घोषणा करायच्या आधी करायला पाहिजे. भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊन चालत नाही, असा सल्ला विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

गोविंदाच्या कुटुंबीयांना विमा देण्यास हरकत नाही. पण अशा पद्धतीने पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा ही चुकीची आहे. लोकशाहीत मनात आले आणि जाहीर केले अस करता येत नाही, सर्वांचा विचार घ्यावा लागतो, असाही सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

कबड्डी खेळाचा रेकॉर्ड असतो, त्यांची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गोविंदांची  स्पर्धा होत नाही. यात गोविंदाचा रेकॉर्ड कसा ठेवणार? मुख्यमंत्री ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात, तिथे दहीहंडी हा मोठ्या प्रमाणत साजरा होतो. त्यांना पाच टक्के आरक्षण देताना एखादा न शिकलेला उमेदवार असेल तर बाकीचे स्पर्धा परिक्षा देणारे काय करणार! असाही प्रश्न उपस्थित केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यानी देखील याबाबत विरोध दर्शवला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular