रोजचेच एक सारखे जेवण खाऊन सुद्धा कालांतराने कंटाळा येऊ लागतो. त्यामुळे निरोगो आयुष्यासाठी खानपानात योग्य बदल करून तुम्ही दीर्घायुषी होऊ शकता. वयोमानाप्रमाणे आपल्या शरीराला आवश्यक आहे तेवढाच आणि तसा हलका आहार घ्यावा. खानपानात विविधता आणली तर, महिलांचे आयुष्य मर्यादा १० वर्षे तर पुरुषांची आयु १३ वर्षे जास्त वाढू शकते, असा दावा नव्या संशोधनातून करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध अभ्यासानुसार २० वर्षांची महिला पोषक आहार सुरू करत असल्यास तिचे आयुर्मान १० वर्षांनी वाढू शकते.
पोषक आहारामुळे वृद्धांचा जीवनकाळही वाढू शकतो. ६०व्या वर्षी जर शरीराला सोसण्याइतका पोषक आहार सुरू केला तर, महिला आपला जीवनमर्यादा ८ वर्षांनी वाढवू शकते. पुरुषांना आणखी ९ वर्षे मिळू शकतात. भाजीपाल्याचा आहारात नियमित समावेश केल्यास ८० वर्षीय वृद्धांना देखील लाभ होऊ शकतो. या काळात आहारात बदल केल्यास पुरुष व महिलांना काही वर्षे आयुष्य वाढते. संतुलित आणि सकस आहार घेतल्याने जुन्या आजारांचा धोका कमी संभवतो आणि मृत्यूची जोखीम देखील कमी करता येते म्हणजे दिर्घायू देखील होता येते.
दिर्घायू आयुष्यासाठी शाकाहारी पदार्थांमध्ये सर्वाधिक लाभदायी शेंगा, डाळी इ. आहेत. मूग, मटकीसारखे पचायला हलके पदार्थ, त्याच बरोबर अक्रोड, बदाम, पिस्ता यांसारखे सुके मेवे विशिष्ट प्रमाणात नियमित सेवन केल्यास अनेक आजार रोखता येतात. कडधान्ये, पालेभाज्याही दीर्घायूसाठी फायदेशीर ठरतात. मांसाहारी पदार्थामध्ये अंडी, चिकन, मासे यांचा देखील ठराविक प्रमाणामध्ये सेवन केल्यास उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे आहाराचे संतुलन राखण्यासाठी फळे, पालेभाज्या, दूध, अंडी, मासे यांचा योग्य प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे.