राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह पुणे, मुंबई, पालघर, सातारा जिल्ह्यात अतिम सळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस कोकणात बहुतांश जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व ताशी २० ते ४० किलोम ीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.