22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriराणेंना हायकोर्टाचा दिलासा, पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला करणार प्रारंभ

राणेंना हायकोर्टाचा दिलासा, पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला करणार प्रारंभ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि समाजामध्ये वाद निर्माण होऊन, हिंस्रक वळण लागणारे विधान केल्याच्या आरोपावरून मंगळवारी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राणे यांना महाड येथील न्यायालयामध्ये रात्री उशिरा प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. राज्यभरात दिवसभर राणे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर आता हायकोर्टाने १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना दिलासा दिला आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतील आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित दाखल करण्यात आलेल्या अनेक शहरांतील गुन्ह्यांमध्ये, आपल्यावर पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश देण्याची नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात मागणी केली होती. पण याचिकेमध्ये केवळ नाशिक गुन्ह्याचा समावेश असल्याने, केवळ त्याच प्रकरणामध्ये कारवाई न करण्याची सरकारची हमी सरकारी पक्षातर्फे देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले कि, दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले असून, अजूनही देशात कायद्याचं राज्य आहे हे स्पष्ट झाले आहे. मी केंद्रात मंत्री झालो, तेंव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्वच मंत्र्यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचे शुभाशिर्वाद घ्या. तुमच्या कामकाजाला आरंभ करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ऑगस्टपासून मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली असून, आता दोन दिवस विश्रांती घेऊन परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला प्रारंभ केला जाणार आहे, त्यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular